आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घाटीमध्ये डेंग्यूने दोन महिलांचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - डेंग्यूमुळे दोन महिलांचा घाटीमध्ये मृत्यू झाला. त्यातील एक महिला शहरातील सादातनगरातील असून दुसरी लोहगाव (ता. कन्नड) येथील रहिवासी आहे. दोन्ही महिलांवर घाटीतील एमआयसीयूमध्ये उपचार सुरू होते. दरम्यान, शहरातील डेंग्य व डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली असून किमान शंभर रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये दाखल असल्याची माहिती वैद्यक तज्ज्ञांकडून मिळाली आहे.

जुलैपासून डेंग्यूचे रुग्ण वाढले होते. गत 15 दिवसांपासून घाटीसह विविध रुग्णालयांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. 12 ऑगस्टला देण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये दोन महिलांना डेंग्यू पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले होते. शहरातील सादातनगर येथील अनिसा रशीद बेग या 50 वर्षीय महिलेला हृदयरोग, मधुमेहाशी निगडित विविध आजार व इतर गुंतागुंत निर्माण झाल्यामुळे घाटीच्या वॉर्ड क्रमांक तीनमधून सहा ऑगस्ट रोजी एमआयसीयूमध्ये हलवण्यात आले होते. आठ ऑगस्टला त्यांचा मृत्यू झाला, तर लोहगाव येथील कौसाबाई रामराव पाटील (65) यांना वॉर्ड क्रमांक चारमधून पाच ऑगस्टला एमआयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते व सहा रोजी त्यांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात वैद्यकीय अधीक्षक डॉ. पी. एल. गट्टाणी यांनी दोन्ही महिलांना डेंग्यू असल्याचा रिपोर्ट मंगळवारी प्राप्त झाल्याचे सांगितले.