आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडील दुकानात, आई पाण्यासाठी हातपंपावर; 2 वर्षांचा रुद्र पडला घरासमोरच्या खड्ड्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
याच खड्डयात पडून रुद्रचा मृत्यू झाला. - Divya Marathi
याच खड्डयात पडून रुद्रचा मृत्यू झाला.
जालना-(कु.पिंपळगाव): घनसावंगी तालुक्यातील राजा टाकळी येथे घर बांधकामासाठी खाेदलेल्या खड्ड्यात पडून 2 वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी 6 वाजेदरम्यान ही घटना घडली. रुद्र अरुण राऊत असे या बालकाचे नाव आहे. 
 
मृत रुद्रचे वडील अरुण लक्ष्मण राऊत हे किराणा सामान आणण्यासाठी शेतातून गावातील दुकानात आले होते. तर आई मुक्ताबाई पिण्याचे पाणी आणण्यासाठी शेतातून जवळच असलेल्या शिवाजी विद्यालयातील हातपंपावर गेली होती. यादरम्यान चिमुरडा रुद्र अंगणात खेळता-खेळता जवळच असलेल्या घर बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात जावून पडला. त्या खड्डयात पाणी काळ्या मातीचा गाळ असल्यामुळे तो त्यात फसला. काही वेळानंतर आई घरी आली तेव्हा तिला रुद्र दिसला नाही. आजुबाजूला पाहिले तरी रुद्र कुठेच दिसत नव्हता. तेवढ्यात तिची नजर खड्ड्याजवळ गेली पाहते तर काय रुद्र त्यात पडलेला होता. कसे-बसे त्याला खड्ड्यातून ओढून वरती काढले, तोपर्यंत रुद्र जिवंत होता. दरम्यान, वडील अरुणसुद्धा शेतात पोहोचले. त्यानंतर आई-वडील रुद्रला कुंभारपिंपळगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. 
 
राऊतकुटूंब राहायचे शेतात अरुणयांना तीन भाऊ असून ते वीटभट्टीच्या कामावर शहागड येथे गेलेले आहेत. तर अरुण हे सर्व भावांची मिळून असलेली ४-५ एकर शेती करत होते. यासाठी ते पत्नी मुक्ताबाई मुलगा रुद्रसोबत शेतातील छोट्याशा घरात राहत होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्यांनी चांगले नवीन घर बांधण्याचा निर्णय घेतला. यासाठी मोठ-मोठे 6 खड्डे खोदून कॉलम उभे केले. कॉलमच्या मजबुतीकरणासाठी ते खड्ड्यात पाणी भरून ठेवत असत. शुक्रवारी सायंकाळी अशाचपद्धतीने पाणी भरलेल्या खड्ड्यात पडून रुद्रचा मृत्यू झाला. 
 
शनिवारी अंत्यसंस्कार
शुक्रवारी सायंकाळी वाजेदरम्यान रुद्रचा मृत्यू झाला. दरम्यान, याची माहिती सर्व नातेवाईकांना देण्यात आली. शनिवार सकाळपर्यंत सर्व नातेवाईक आल्यावर १० वाजेदरम्यान रुद्रवर शेतातच अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. अत्यंत गोंडस अशा बाळाचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे उपस्थितांनी हळहळ व्यक्त केली. तर मृत रुद्राच्या आई-वडीलांचे सांत्वन करत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. 
 
बातम्या आणखी आहेत...