आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Young Leaders Pankaja Munde And Aditya Thackeray, Divya Marathi

पंकजा आणि आदित्य : दोन तरुण नेतृत्वांचा उदय ; कठीण काळात सत्त्वपरीक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद/मुंबई - महाराष्ट्र विधानसभेच्या या निवडणुकीने राज्याच्या राजकीय पटलावर दोन तरुण नेत्यांचा उदय झाला. या उदयाचे वैशिष्ट्य असे की, दोघांसाठी अत्यंत कठीण अशी परिस्थिती त्यांच्या समोर प्रारंभीच येऊन ठेपली आहे. या परिस्थितीला ते कसे सामोरे जातात, याकडे सा-या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. दोघांकडे असलेले गुण आताच ब-यापैकी समोर आले आहेत हेही त्यांच्या आगमनाचे वैशिष्ट्य आहे. या दोघांची नेतृत्वगुणांच्या पटलावर केलेली ही तुलना.

पंकजा पालवे-मुंडे ही ३५ वर्षे वयाची तरुणी भारतीय जनता पक्षातील एक तडफदार आणि महिला नेतृत्व म्हणून मे २०१४ पासून प्रकर्षाने समोर आली आहे. वडील लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा यांनी दाखवलेला खंबीरपणा, जनसमूहाला नियंत्रित आणि संबोधित करण्याचे कौशल्य सा-या देशाने पाहिलं आहे. या निवडणुकीत स्वत: उमेदवारी करत मराठवाड्याचे नेतृत्वही त्या करीत आहेत.

1. राजकीय करिष्मा
*लोकनेते हा सन्मान मिळालेल्या गोपीनाथ मुंडे यांचा कौटुंबिक आणि राजकीय वारसा.
*मोठा जनाधार लाभलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या घराण्याचा वारसा.
2. समंजसपणा
*योग्य वेळी महाराष्ट्रात संघर्ष यात्रा काढून राजकीय टायमिंगचे दर्शन घडवले.
*युतीच्या जागावाटप चर्चेत मित्रपक्षाच्या नेत्यांशी चर्चा करून ठोस भूमिका मांडली.
3. संघटन कौशल्य
* भाजपच्या युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळत युवा वर्ग आकर्षित केला.
*शिवसेनेच्या युवा सेनेचे राज्य पातळीवरचे नेतृत्व करत युवकांची फौज जोडून दिली.
4. निवडणुकीचा अनुभव
*गोपीनाथ मुंडेंच्या लोकसभा निवडणुकीत कौशल्य पणाला लावून यशाची भागीदार.
*मुंबई विद्यापीठ अधिसभेच्या निवडणुकीत यश संपादन करून झेंडा फडकवला.
5. हजरजबाबीपणा
* पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीत समर्पक उत्तरे देत कौशल्य सिद्ध केले.
* युतीच्या जागावाटप चर्चेत माध्यमांना सामोरे जाताना हजरजबाबीपणा दाखवला.
6. मिशन
* भाजपला राज्यात सर्वाधिक जागा मिळवून देणे.
*शिवसेनेला आगामी विधानसभा निवडणुकीत १५० आमदार मिळवून देणे.

आदित्य उद्धव ठाकरे हा २४ वर्षे वयाचा तरुण शिवसेना या प्रादेशिक पक्षाचा भावी नेता म्हणून या निवडणुकीच्या निमित्ताने प्रकर्षाने पुढे आला आहे. शिवसेनेतील भाऊबंदकीला सामोरे जाणा-या आपल्या वडिलांना पाहत त्याचे राजकारणात आगमन झाले आहे. स्वत: कोणतीही निवडणूक लढवलेली नसली तरी निवडणुकीचे नियोजन करण्याचा अनुभव घेतच त्याने प्राथमिक पातळीवर नेतृत्वगुण सिद्ध करून दिले आहेत.