आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नपत्रिका वाटणाऱ्या नवरदेवासह दोघांचा झाला अपघाती अंत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - स्वत:च्या लग्नपत्रिका वाटत असताना भावी नवरदेवाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे त्याच्यासह चुलत भावाचा अंत झाला. ही दुर्दैवी घटना गुरुवारी मध्यरात्रीला साडेबाराच्या सुमारास दहेगाव बंगल्याजवळ घडली. रवींद्र मच्छिंद्र म्हस्के (२२, रा. सिद्धनाथ वाडगाव,तांदूळवाडी,ता. गंगापूर) प्रदीप नानासाहेब म्हस्के (३०) अशी मृतांची नावे आहेत.
रवींद्रचा १७ फेब्रुवारी रोजी कन्नड तालुक्यातील एका तरुणीशी विवाह ठरला होता. दोन दिवसांपासून तो लग्नाच्या पत्रिका वाटत होता. गुरुवारी सायंकाळी तो आणि त्याचा चुलत भाऊ प्रदीप हे दोघे (एमएच २० -२११९) दुचाकीने औरंगाबादेतील नातेवाइकांना पत्रिका देण्यासाठी आले होते. काही जणांना पत्रिका दिल्यानंतर रात्री उशिरा ते गावाकडे परतत असताना पाठीमागून भरधाव आलेल्या एका अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी होऊन जागीच गतप्राण झाले. अपघातानतंर दोघेही घटनास्थळी पडून होते. त्यांना वेळीच मदत मिळाली असती तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते. तपास सहायक पोलिस निरीक्षक अनिल परझने करत आहेत.