आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादचे दोन युवक देशभ्रमंतीवर, प्रिन्स शेख आणि अनिकेत हारेरचा ‘जगण्याचा नवा मार्ग’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - युवक म्हणजे चैनीत आणि ऐटीत जगणारे छांदिष्ट अशी व्याख्या बहुतांश लोक करतात. मात्र, औरंगाबादच्या दोन युवकांनी ही चौकट मोडून एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. पैशाशिवायही जगता येते हे दाखवून देण्यासाठी खिशात दमडीही न बाळगता अनिकेत हारेर आणि प्रिन्स शेख देशभ्रमंतीवर निघाले आहेत.
ज्या पैशांशिवाय जगता येते मात्र त्याच पैशासाठी वाईट सवयींच्या आहारी जाणे, आत्महत्या करणे चुकीचे आहे,असा संदेश ते देशभरातील युवकांना देऊन जनजागृतीही करत आहेत. ६ नोव्हेंबरपासून अनिकेत आणि प्रिन्स यांनी औरंगाबादहून देशभ्रमंतीस प्रारंभ केला. सध्या ते तिरूपतीला पोहोचले आहेत.

युवकांना संदेश : या प्रवासात अनिकेत आणि प्रिन्स व्यसनमुक्ती, वाईट छंदापासून बचाव, स्त्रीभ्रूणहत्या, पाणी बचाव इत्यादी समाजातील विविध समस्यांबाबत प्रबोधन करणार आहेत. या दोघांनी यासाठी विविधप्रकारचे पोस्टरही तयार केले आहेत. शिवाय, संबंधीत ठिकाणी सादर केलेल्या कार्यक्रमाचे व्हिडिओसुद्धा ते सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांवरुन उपलब्ध करुन देणार आहेत. त्यांच्या व्हिडिओलाही तरुणाईकडून चांगला प्रतिसाद येत आहे. दिवसागणिक हिट्स वाढत आहेत. वेगळ्या वाटेने जाऊन नवी पायवाट पाडू इच्छिणारे हे दाेन्ही तरुण पत्रकारितेच्या पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी अाहेत.
हॉटेलात काम, सादरीकरणावर उदरनिर्वाह
आम्ही आमच्यासोबत एकही पैसा घेतलेला नाही. ज्या शहरात जाऊ त्याठिकाणी चौकात, शाळेत जाऊन गिटार, गाण्यांचे कार्यक्रम सादर करणार आहोत. वेळ पडल्यास हॉटेलमध्ये किंवा अन्य ठिकाणी वाटेल ते काम करून उदरनिर्वाह करून कमी खर्चात जास्तीत जास्त आनंद कसा मिळवता येईल याचा मार्ग शोधण्याचा आमचा प्रयत्न आह, असे हे दोघेही युवक सांगतात.
बातम्या आणखी आहेत...