आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Uddhav Thackeray News In Marathi, Shiv Sena, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोर्चे कसले काढता, केंद्राकडून मदत द्या; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी भाजपने औरंगाबादेत काढलेल्या मोर्चाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे वाभाडे काढले. दोन महनि्यांनंतर राज्यात सरकार येईल तेव्हा बघू पण सध्या केंद्रात आपले सरकार आहे. आता मोर्चे काढून मागण्या काय करत बसलात, त्यापेक्षा शेतकऱ्यांमध्ये जाऊन त्यांना दिलासा द्या, तुमच्या कृषिमंत्र्याला बोलवा. त्यांना म्हणा येथे दौरा करा, केंद्राचे छत्र द्या, अशा शब्दांत त्यांनी केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपला सुनावले. २५ आणि २६ ऑगस्टला शिवसेनेचे सर्व खासदार मराठवाड्याचा दौरा करून शेतकऱ्यांना दिलासा देतील, असे ठाकरे म्हणाले.

औरंगाबादच्या समांतर जलवाहनिी प्रकल्प आणि भूमिगत गटार योजनेचे भूमिपूजन ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेही उपस्थित होते.

दानवेंना उद्देशून ठाकरे यांनी दानवेंना उद्देशून भाजपच्या दुष्काळी मोर्चाचे वाभाडे काढले. ते म्हणाले की, मराठवाड्यातील दुष्काळ भयानक आहे. गेल्या दीड महनि्यात ६० ते ७० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पाऊस झाला नाही तर ही संख्या वाढू शकते. राज्यात आपलीच सत्ता येणार आहे.तेव्हा काय निर्णय घ्यायचा तो आपण घेऊ. तोवर शेतकऱ्यांना सांगा, राज्य सरकार देत नाही म्हणून काही बिघडत नाही, आम्ही पाठीशी आहोत हे दाखवून द्या.

तुमच्या कृषिमंत्र्यांना मराठवाड्यात आणा
राज्य सरकार काही करत नसेल तर केंद्र सरकारने त्यांना आपले छत्र द्यावे. आमचे सर्व खासदार मराठवाड्यात जात आहेत. दानवे, तुम्हीही आमच्या खासदारांसोबत शेतकऱ्यांकडे जा. दुष्काळावर मोर्चे काढून मागण्या करण्यापेक्षा तुमच्या कृषिमंत्र्यांनाही मराठवाड्यात दौरे काढायला सांगा.
- उद्धव ठाकरे
(रावसाहेब दानवेंना उद्देशून)

मी १२ छिद्रांचा पाना, मला डावलू नका
मी आता केंद्रात मंत्री आहे. माझे खाते कोणते आहे यावर जाऊ नका. प्रत्येक खात्याच्या मंत्र्याशी संबंध येतो. तू माझे कर मी तुझे करतो, असे तेथे चालते. मी सायकलीसाठी वापरल्या जाणाऱ्या १२ छिद्रांच्या एकाच पान्याप्रमाणे आहे. तुम्ही मलाही सोबत घ्या. सर्व मिळून प्रयत्न करू, तुम्ही एकटेच का बरे पळता?
- रावसाहेब दानवे
(खासदार चंद्रकांत खैरेंना उद्देशून)

पवार, तटकरेंचे दूध का दूध होऊन जाऊ द्या!
तुम्ही घोटाळे केले नाहीत असे म्हणता तर मग आता ‘दूध का दूध अन् पानी का पानी’ होऊन जाऊ द्या, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला चौकशीची परवानगी देऊन टाका, असे आव्हान ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना दिले. पंतप्रधान मोदींच्या सभेला उपस्थित न राहण्याच्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या भूमिकेवर टीका करताना ते म्हणाले की, ठरवून कोणी अपमान करत नाही, उगाच कशाला भांडवल करता?

मनसेशी संबंधित प्रश्नावर काढता पाय
मुंबईत थीम पार्कच्या उभारणीवरून शिवसेना आणि मनसेमध्ये जोरदार वाद सुरू आहे. या वादाबद्दल प्रश्न उपस्थित करताच उद्धव ठाकरे यांनी उत्तर न देता काढता पाय घेतला.

शिवसेनेचे माजी खासदार-आमदार समर्थक भिडले
िहंगोली िजल्ह्यातील शिवसेनेत वर्षभरापासून दोन गटांत सुरू असलेल्या धुसफुशीने शनिवारी हिंसक वळण घेतले. माजी आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा आणि माजी खासदार सुभाष वानखेडे समर्थकांमध्ये वधिानसभेच्या उमेदवारीवरून वसमतमध्ये फ्रिस्टाइल हाणामारी झाली. संपर्कप्रमुख आनंद जाधव यांच्या बैठकीत हा प्रकार घडला. डॉ. मुंदडांना डावलण्यावरून सुरू झालेल्या बाचाबाचीचे हाणामारीत रूपांतर झाले.
तिकिटावरून वाद : मुंदडांना डावलून राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या शिवाजी जाधवांना वसमतची उमेदवारी देण्याचा वानखेडेंचा प्रयत्न आहे. त्यावरूनच वादाला तोंड फुटले आणि हाणामारी झाली.