आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav Thackeray News In Marathi, Shiv Sena, Divya Marathi, Chandrakant Khaire

उद्धव ठाकरे यांच्या कानउघाडणींने सेनेच्या पदाधिका-यांमध्‍ये पसरली अस्वस्थता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - निवडणूक प्रचारात ढेपाळलेली यंत्रणा आणि चंद्रकांत खैरे यांना निवडणूक सोपी नसल्याच्या स्थानीय लोकाधिकार समितीच्या अहवालावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांची कानउघाडणी केली. यामुळे पक्षात अस्वस्थता पसरली आहे.


शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी बुधवारी ठाकरे यांची सभा झाली. शहरात आल्यानंतर त्यांनी आमदार व काही पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. त्यानंतर स्थानीय लोकाधिकार समितीच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. समितीने मतदारसंघाची स्वतंत्र पाहणी करून ठाकरे यांना अहवाल सादर केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अहवालात खैरे यांची परिस्थिती सांगितली जाते तेवढी सोपी नसल्याचे स्पष्ट करून प्रचार यंत्रणा व संघटनेतील त्रुटींवर बोट ठेवले आहे. या अहवालाची दखल घेत ठाकरेंनी सभेआधी आणि नंतर मोजक्या पदाधिकार्‍यांना याबाबत जाब विचारला. औरंगाबादची जागा महत्त्वाची असल्याने त्यात दगाफटका होता कामा नये, असे सांगत प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राहिलेल्या त्रुटी दूर करा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. मनपाचे विषय खैरे यांना अडचणीचे ठरणार असल्याचे ठाकरे यांच्या कानी टाकण्यात आल्याने त्यांनी आपल्या भाषणात त्यावर आवर्जून भाष्य केले. यापुढे शहराच्या विकासावर आपण स्वत: लक्ष ठेवणार असल्याचे सांगितले.