आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरे यांची आज जाहीर सभा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेनंतर हादरलेल्या शिवसेनेने शक्तिप्रदर्शनातून उत्तर देण्याची तयारी सुरू केली असून मंगळवारी (दि. 7 ऑक्टोबर) शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे.
या सभेच्या यशावर शिवसेनेची प्रचाराची पुढील दिशा ठरणार आहे. खासदार चंद्रकांत खैरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत या सभेबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, मंगळवारी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सायंकाळी सहाला ठाकरेंची सभा होत असून त्यात जिल्ह्याच्या नऊ मतदारसंघांतील कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून तो याही वेळी शिवसेनेकडेच राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.