आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Uddhav Thackray Visit Marathwada MuktiSangram Sangrahalaya

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पदाधिकारी अंधारात; उद्धव ठाकरे ‘सिद्धार्थ’मध्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - गटनेत्यांना मार्गदर्शन केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रात्री साडेआठ वाजता सिद्धार्थ उद्यानात उभारण्यात येत असलेल्या मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या संग्रहालयाची पाहणी केली. स्थानिक पदाधिकार्‍यांना मात्र टाळण्यात आले. मुंबईहून आलेले नेते, खासदार चंद्रकांत खैरे, महापौर कला ओझा, आमदार प्रदीप जैस्वाल, ेसंजय शिरसाट वगळता एकही पदाधिकारी या वेळी उपस्थित नव्हता.

पालिकेतील युतीचे नेते, सभागृहनेते, जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख यापैकी कोणीही नसल्यामुळे स्थानिकांनी आश्चर्य व्यक्त केले. उद्धव ठाकरे यांना संग्रहालयाचे काम पाहण्याची त्यांची इच्छा होती, त्यामुळे ऐनवेळी तेथे गेल्याचे खैरे यांनी सांगितले. सोबत सर्व स्थानिक पदाधिकारी होते, असा दावाही त्यांनी केला. मात्र खासदार, आमदार आणि महापौरांनीच ठाकरे यांना घेऊन सिद्धार्थचा दौरा केल्याने पालिका पदाधिकार्‍यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान या दौर्‍याची कल्पना नव्हती, ठाकरे यांनी सिद्धार्थमधील संग्रहालय पाहिल्याचे माहिती नसल्याचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे म्हणाले. विशेष म्हणजे त्यावेळी दानवे आणि खैरे सोबत होते. औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील शिवसेनेचा उमेदवार मेळावा सोडून प्रचारार्थ जालन्याला गेले होते. त्यांनाही या दौर्‍याची कल्पना नव्हती.