आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकही भारतीय संविधान मानतो : उज्ज्वल निकम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शत्रूराष्ट्र पाकिस्तानही भारतीय संविधानाला मानतो, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. भारतीय न्यायालयात चाललेल्या खटल्यांचा आधार पाकिस्तानात वकील घेत असतात, असे पाकिस्तानच्या अॅटर्नी जनरलनी सांगितले आहे, असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केले.
 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षाच्या समारोपीय व्याख्यानमालेत राष्ट्र उभारणीत भारतीय संविधानाचे योगदान : आव्हाने उपाय या विषयावर तिसरे पुष्प गुंफताना निकम बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ञ भगवानराव देशपांडे होते. भारतीय संविधान बदलण्याचा विचार तुघलकी आहे, ते कुणीही बदलू शकत नाही. राज्यघटनेवर कुणी घाला घालत असेल तर जनता सहन करणार नाही, ती रस्त्यावर उतरेल. संविधानाचे योगदान बाबासाहेबांनी राज्यघटनेच्या माध्यमातून सांगितले आहे. ते भावी पिढीने जोपासले पाहिजे, असेही ते म्हणाले.
 
राष्ट्रपतीनियुक्त सदस्यांचा राष्ट्राला काय उपयोग आहे, हा समाजापुढे प्रश्न उभा झाला आहे. खासदार काय काम करतात, लोकांचे काय प्रश्न मांडतात हे दिसून येत नाही. याबाबतही विचार होणे गरजेचे आहे. कायदे कठोर करून चालणार नाही. बंदुकीच्या गोळीप्रमाणे त्यांचा धाक असला पाहिजे. पोलिसांनी कितीही आरोप केले तरी न्यायालयात ते सिद्ध होईपर्यंत तो गुन्हेगार होऊ शकत नाहीत, हे समजून घेणे गरजेचे आहे. सत्य बोलण्याची ताकद असू द्या, असे आवाहनही निकम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विजया शिरोळे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. व्ही. व्ही. थेटे यांनी केले. व्याख्यानमालेसाठी प्रा. सुशांत खेडगीकर, प्रा. राज महेंद्र सावंत, प्रा. एस. एम. कुलकर्णी, प्रा. फैज सिद्दिकी, प्रा. प्रशांत पंडित, प्रा. एम. एम. दुबे, सुभान बेग, यादव कदम, आर. आर. जाधव यांनी परिश्रम घेतले.
 
बातम्या आणखी आहेत...