आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा देश आमचा होता आणि राहील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - काही शक्ती आमच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, परंतु आम्ही घाबरणारे नाही. कारण हा देश आमचा आहे, आमचा होता आणि आमचा राहणार, असे मत जमिअत उलेमा हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना अर्शद मदनी यांनी केले. एम्पिरियल लॉन्स येथे शुक्रवारी सकाळी ११ वाजता "देशातील आजची परिस्थिती आणि आमचे आचरण' या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

भाजप आणि संघाच्या लोकांनी काही लोकांना हाताशी धरून हिंदू-मुस्लिम असा वाद चालवला आहे. देश जगातील परिस्थिती लपून राहिली नाही. जगात काय सुरू आहे. हे सोशल मीडियाच्या माध्यमातून घरबसल्या प्रत्येकालाच कळत आहे. फाळणीनंतर देशात २० हजारांपेक्षा जास्त दंगली झाल्या. यामध्ये अल्पसंख्याक समुदायाला टार्गेट करण्यात आले. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शिखांची हत्या करण्यात आली.

निष्पाप लोेकांची हत्या आम्ही कदापिही सहन करणार नाही. ८०० वर्षांनंतरही मुस्लिमांना कुणी धर्मापासून वेगळे करू शकले नाही. मुस्लिम समाज गरीब आहे, पण मजबूर नाही. जे सत्याच्या मार्गावर चालतात त्यांना अल्लाह मदत करतो. या देशाचे संविधान धर्मनिरपेक्ष आहे. अन्यथा काही शक्तींनी देशाला िहंदू राष्ट्र बनवले असते, असेही मौलाना मदनी यांनी सांिगतले.

या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे अध्यक्ष मुस्तकिम आजमी, गुलजार आजमी, मराठवाडा अध्यक्ष मुप्ती कलीम, इसा काशफी, सुरजितसिंग खुंगर, मौलाना मुजिबाेद्दीन, मौलाना नसीम मिफ्ताही, मौलाना मोईज फारुखी, जिल्हाध्यक्ष हाफिज शेर खान यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुफ्ती मोहसीन यांनी केले.
बातम्या आणखी आहेत...