आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील 4 लाख अनधिकृत ऑटोरिक्षा अधिकृत होणार; परिवहन मंत्री दिवाकर रावतेंची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- ‘खासगी संवर्गात नोंदणी करून अनधिकृतपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या राज्यातील चार लाख ऑटोरिक्षांना अधिकृत करण्याचा निर्णय सरकारने घेतला अाहे. यात मराठवाडा व विदर्भातील संख्या माेठी अाहे. त्यांचा रोजगार अबाधित राहावा,  हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन हे पाऊल उचलण्यात आले.  एक ते ५ हजार रुपये शुल्क भरल्यानंतरच नवीन परवाना मिळेल,’ अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शुक्रवारी दिली. 

खासगी संवर्गात नोंदणी असणारी ऑटोरिक्षा व टॅक्सी (पांढरी नंबर असलेली ऑटोरिक्षा) नवीन परवान्यावर पिवळ्या नंबर प्लेट असलेल्या संवर्गात नोंदणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी शासनाने निश्चित केलेले अतिरिक्त परवाना शुल्क अदा करणे अनिवार्य राहील. प्रथम नोंदणी दिनांकपासून एक वर्षापेक्षा कमी कालावधी असल्यास १ हजार रुपये, दोन वर्षे दोन हजार, पाच ते आठ, दहा वर्ष झाले असल्यास पाच हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यासाठी मार्च २०१८ पर्यंतच मुदत असल्याचे रावते यांनी स्पष्ट केले.  राज्यात ऑटोरिक्षा आणि टॅक्सीच्या परवान्यावरील निर्बंध हटवण्यात आले असून मागेल त्याला परवाना देण्याचे धोरण सरकारने जाहीर केले आहे. पूर्वी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, सोलापूर, नाशिक आणि औरंगाबाद शहरातील परवान्यावर बंदी घातली होती.
 
नवीन स्टील मॉडल बस येणार
दिवाळीतील प्रवाशी, पर्यटक, उद्योग, व्यवसाय, अशा विविध क्षेत्रातील प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन राज्यात सुमारे ५० ते ६० शिवशाही बस धावणार असल्याचे रावते यांनी सांगितले.   प्रवाशी सुरक्षा डोळ्यासमोर ठेऊन अॅल्यूनियमच्या ऐवजी नवीन स्टिल बांधणीच्या बसेस निर्मिती केली जात आहे. लवकरच या बसेस येतील, असे संकेतही दिलेत.  
 
८ हजारांवर पदांची भरती 
आठ दहा वर्षांपासून भरती झाली नसल्याने आरटीओ कार्यालयात मोठ्याप्रमाणावर रिक्त जागा आहेत. लवकरच १ हजार अधिकारी व कर्मचारी नियुक्त होतील. तर एसटीत एकूण सात हजार रिक्त जागा भरल्या जाणार असल्याचे रावतेयांनी सांगितले.  एसटी कर्मचारी पगार वाढीबाबत युनियने निर्णय घेऊन  प्रस्ताव  पाठवावा. त्यानंतर पुढील कारवाई होईल, असे रावते  यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...