आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Unauthorized Construction Spree Continues In Satara Area

झालरक्षेत्रात अनधिकृत बांधकामांचा सपाटा सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


आैरंगाबाद - सातारा परिसरातील अनधिकृत बांधकामांवर जिल्हा प्रशासनाने हातोडा उगारताच भूमाफियांनी आपला मोर्चा झालरक्षेत्रातील इतर गावांकडे वळवला असून सिडकोची परवानगी घेता आकर्षक जाहिरातींच्या माध्यमातून प्लॉट सदनिकांची विक्री सुरू केली आहे. अशा ५० पेक्षा जास्त अनधिकृत विकासकांना सिडको प्रशासनाने नोटिसा बजावल्या आहेत.

शहरालगतच्या सावंगी कृष्णापूरवाडीत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे प्लाॅट विक्रीचा धंदा तेजीत आहे. अनधिकृत बांधकामांचा सर्वाधिक परिणाम पिसादेवी, गोपाळपूर, हिरापूर, झाल्टा आदी गावांतही दिसून येत आहे.

सिडकोच्या अडचणीत वाढ
सिडकोप्रशासनाने काही दिवसांपूर्वी एक अनधिकृत बांधकाम केलेली कंपाउंड वाॅल पाडली होती. सातबारावर एका व्यक्तीचे नाव आणि संबंधित प्लॉटिंगच्या भूखंडावर फलक मात्र दुसऱ्याचा आढळून येतो. विकसित करणारी व्यक्ती तिसरीच असल्याचे जाणवते. जमीन मालकासंबंधी विचारणा केली तर एक नाव सांगितले जाते. विकसित करणारी व्यक्ती कुठे आहे अशी विचारणा केली तर येत आहे, असे सांगितले जाते. आैरंगाबादला ऑफिस आहे म्हणून सिडकोच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात येते. संबंधित व्यक्तीचा शोध घेतला असता ती भेटत नसल्याने गुन्हे दाखल करण्यास अडचणी निर्माण होत आहेत.

आकर्षक जाहिरातींची भुरळ
परिसरातीलप्लॉटिंग गृहप्रकल्पाच्या आकर्षक जाहिराती देऊन कमी किमतीचे आमिष दाखवले जाते. नागरिक मध्यमवर्गीय कुटुंबातील नागरिक जाहिरातींच्या आहारी जात प्लॉट अथवा घरांसाठी नोंदणी करत आहेत.

सिडकोने कंबर कसली
सिडकोप्रशासनाने मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक नियुक्त करून झालरक्षेत्रातील अनधिकृत बांधकामे प्लाॅट विक्रीविरुद्ध कंबर कसली आहे. पथकात वरिष्ठ नियोजनकार आशुतोष वुईके, उपनियोजनकार अभिजित पवार, विकास अधिकारी पंजाबराव चव्हाण, मुख्य नियंत्रक अनधिकृत विभागप्रमुख गजानन साटोटे, सहायक आरेखक जी. आर. वीर आदींचे पथक तयार केले आहे.

जगदंब रो-हाऊस अनधिकृत
सावंगीतीलजगदंब रो-हाऊस प्रकल्प अनधिकृत असल्याचे सिडको प्रशासनाने प्रसिद्धिपत्रकात म्हटले असून साठ रो-हाऊसेसच्या गृह प्रकल्पास सिडकाेने परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट केले आहे. १४ ऑगस्टला जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर त्याविरुद्ध कारवाई केली असून संबंधितास नोटीस बजावली आहे.

प्लाॅटविक्री सुरू
प्रगतीप्रापर्टीज नावाने अशाच प्रकारे प्लाॅट विक्री सुरू असल्याचे सिडकोच्या वतीने सांगण्यात आले. शहरातील द्वारकादास शामकुमार येथे त्यांचे कार्यालय असून प्लॉटिंगसंबंधी माहिती घेतली असता जमीन मालकाच्या नावानेच प्लॉट विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले; परंतु त्यास परवानगी नसल्याचे निदर्शनास आले. पिसादेवी परिसरात ५० रो-हाऊसचा प्रकल्प अनधिकृतपणे आकारास येत आहे. याची कागदपत्रे सादर करण्यास टाळाटाळ केली जात आहे.

अधिकृत मालमत्ता कशा आेळखणार ?
झालरक्षेत्रातसिडको प्रशासनाच्या वतीने बांधकाम रेखांकनाची (ले-आऊट) परवानगी दिली जाते. वर्ष २००८ पूर्वी नगररचना विभागाने रेखांकनाची झालरक्षेत्रातील २८ गावांना परवानगी दिलेली आहे. त्यानंतर सिडकोला प्राधिकरण नियुक्त करण्यात आले आहे. गृहकुल योजनेत घर अथवा प्लॉट घ्यायचा असेल, तर त्याचा नकाशा सिडकोने मंजूर केलेला असावा, असे वरिष्ठ नियोजनकार आशुतोष वुईके यांनी सांगितले.