आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोस्टरबाजांवर कारवाई होत नसेल तर आम्ही पैसा का खर्च करावा ?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरात एक जातो आणि दुसरा येऊन पोस्टरबाजी करतो. हे चक्र कायम सुरू आहे. मनपा गुन्हे दाखल करण्याच्या केवळ बाता करते. गुन्हे दाखल केलेच तर तेही गैरराजकीय लोकांवर केले जातात. छोट्या-मोठ्या संघटना, कार्यकर्ते पोस्टरबाजीची घाण शहरभर पसरवतात. दुसरीकडे मनपा उद्योजक-व्यावसायिकांना शहरातील सौंदर्य बेटे विकसित करण्याची विनंती करते. या आवाहनाला चांगला प्रतिसादही मिळतो. पण पोस्टरबाज पुन्हा ही सौंदर्यबेटे विद्रूप करतात. या पोस्टरबाजांना तुम्ही थांबवणारच नसाल, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार नसाल तर आम्ही हा पैसा खर्च का करावा, असा सवाल आता उद्योजक-व्यावसायिक मनपा आयुक्त बकोरिया यांना करत आहेत.
माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या वाढदिवसाची पोस्टर्स लावून कार्यकर्त्यांनी विद्रूपीकरण केले. त्यावर डीबी स्टारने वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी पोस्टर्स काढले. पण लगेच दुसरे पुढे आले. हंडोरेंसाठी पोस्टर्स लागले आता प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी पोस्टरबाजी करून विद्रुपीकरण केले आहे.

विद्रूपीकरण होऊ देणार नाही
आम्ही जे सौंदर्यबेट विकसित करू त्यावर कुणालाही पोस्टरबाजी करू देणार नाही. त्याची देखभालही आम्ही करू. अर्थात त्याचे विद्रूपीकरण होणार नाही याची जबाबदारी मनपाची असली तरी आम्हीही मनपाला त्याबाबतीत मदत करू. एन.श्रीराम, व्हाइसप्रेसिडेंट, एन्ड्रेस हाउजर

आयुक्तांना लिहा पत्र
सौंदर्य बेटे विकसित करणाऱ्या शहरातील सर्व उद्योजक-व्यावसायिकांनी तसेच संस्था-संघटनांनी आम्ही सौंदर्यबेटे विकसित करतो, पण त्यावर पोस्टरबाजी होऊन ते विद्रूप होणार नाही याची हमी आम्हाला द्या, असे पत्रच महापालिकेच्या आयुक्तांना द्यावे. मनपानेही हा शब्द पाळावा कारवाई करून सौंदर्यबेटे चांगली ठेवावीत.

बकोरिया साहेब, हे करा
{फ्लेक्स आणि कागदांवर प्रिंटिंग करून त्याची छपाई करणाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना पोस्टर कोण लावणार आहे, कुठे लावणार आहे याचे हमीपत्र घेण्याची सक्ती करावी.
{ पोस्टर वा होर्डिंग लावणाऱ्याचा त्या पोस्टर-होर्डिंगजवर मोबाइल नंबर असावा.
{ मनपाच्या परवानगीची पावती पाहिल्याशिवाय छपाईवाल्यांनी पोस्टरची छपाई करू नये. संबंधित पोस्टरवर परवानगीच्या पावतीचा नंबर टाकावा.
{ राजकीय पक्ष संघटनांची खास बैठक बोलवावी. पोस्टरबाजीमुळे शहर कसे विद्रूप होत आहे याचे महत्त्वही त्यांना पटवून द्यावे. परवानगी घेऊनच अधिकृत जागांवरच पोस्टर्स लावावेत हे त्यांना समजून सांगावे.
{ शहरभरातील पोस्टर्स काढण्यासाठी एक महास्वच्छता अभियान घ्यावे. त्यात संपूर्ण शहराने सहभागी व्हावे यासाठी प्रयत्न करावेत. एकदा हे अभियान पार पडले की त्यानंतर मात्र कुणी पोस्टर लावले तर त्याच्यावर थेट गुन्हे दाखल करावेत.

मनपाने जबाबदारी घ्यावी
मनपा वाहतूक बेटे विकसित करण्याचे आवाहन करते. पण नंतर हीच बेटे पोस्टरबाजांकडून विद्रूप केली जातात. त्यामुळे पोस्टरबाजांवर गुन्हे दाखल झाले तरच हा सर्व प्रकार थांबेल. त्याची जबाबदारी आधी मनपाने घ्यावी. मगच लोक ही वाहतूक बेटे विकसित करण्यासाठी पुढे येतील. -बालाजीपाटील, बांधकामव्यावसायिक

संयुक्त कारवाई करावी
आम्ही वाहतूक बेटांचे सुशोभीकरण करायला तयार आहोत, पण नंतर त्याचे विद्रूपीकरण व्हायला नको. यासाठी मनपा-पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करायला हवी. जोपर्यंत पोस्टरबाजांवर गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत हे थांबणार नाही. शहरासाठी आमच्या परीने जास्तीत जास्त करू पण मनपा पोलिसांनीही साथ द्यावी. संदीपनागोरी, अध्यक्ष,सीआयआय
बातम्या आणखी आहेत...