आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

२३२ अनधिकृत धार्मिक स्थळे, फेरतपासणीनंतरच हाेईल निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सार्वजनिक खासगी जागांवर असलेली २००९ नंतरची २३२ अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्याबाबतचा निर्णय घेताना नागरिकांचा राेष लक्षात घेत महापालिकेने ‘अास्ते कदम’ जाण्याची भूमिका घेतली अाहे. त्याचाच एक भाग म्हणून पुन्हा एकदा स्थानिकांकडील पुराव्यांची फेरतपासणी करण्याचा निर्णय घेण्यात अाल्याची माहिती उपायुक्त राेहिदास बहिरम यांनी दिली.
महापालिका क्षेत्रातील २००९ नंतरची तीनशेहून अधिक अनधिकृत धार्मिक स्थळे हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली अाहे. तूर्तास, रस्त्याच्या कडेला असलेली ८४ अनधिकृत धार्मिक स्थळे हटवण्यात अाली अाहेत. त्यानंतर २३२ अनधिकृत धार्मिक स्थळे काढली जाणार असून, त्यातील बहुतांश स्थळे महापालिका, सरकारी, सार्वजनिक खासगी जागेत अाहेत. मात्र, यातील अनेक मंदिरे २००९ पूर्वीची असून, तसे पुरावे असल्याचेही भाविकांचे दावे अाहेत. परिणामी, अशी मंदिरे पाडणे अयाेग्य असल्याचे मत व्यक्त करीत नागरिक अाक्रमक भूमिका घेत अाहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेने नैसर्गिक न्यायाची पुन्हा संधी देत पुरावे देण्याची विनंती केली अाहे. फेरतपासणी करूनच धार्मिक स्थळे पाडली जातील, असे बहिरम यांनी सांगितले.

अायुक्तांच्या दालनासमाेर ठिय्या : गंगापूर,शिवाजीनगर भागातील अनधिकृत धार्मिक स्थळे काढू नये, या मागणीसाठी नागरिकांनी महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करीत कारवाईस स्थगिती देण्याची मागणी केली. न्यायालयाच्या निर्दशानुसार कारवाई हाेत असल्याचे सांगत आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी स्थगितीच्या मागणीला स्पष्ट शब्दात नकार दिला. गृहनिर्माण संस्थांमधील खुल्या जागांवर नियमानुसार संबधित माेकळी जागेवर प्लाॅटधारकांचा हक्क असताे. त्यामुळे तेथील धार्मिकस्थळांना हटवू नये अशी मागणी त्यांनी केली. यावेळी विनायक लवांड, लक्ष्मण साळुंके, मनोेहर पाडवी, राहुल पाटील, सारीका पाटील, प्रतिभा महिरे, अनंत पाठक, सुभाष भंवर आदी सहभागी झाले होते.
बातम्या आणखी आहेत...