आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरगुती पुरवठ्याच्या पाइपलाइनवर एडीसीएचे अवैध कनेक्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सिडको एन-२ परिसरातील रहिवासी भागात दोन दिवसांपासून पाणीगळती सुरू होती. डीबी स्टारने त्याची छायाचित्रे घेतली आणि त्याचा तपास केला असता मनपाने औरंगाबाद जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अवैध नळ कनेक्शन तोडून कारवाई केल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे कायद्यानुसार घरगुती पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीतून अशी जोडणी देता येत नाही. एडीसीए मात्र आमची नळजोडणी वैध असल्याचे म्हणत आहे. दुसरीकडे पालिकेने कारवाई केली, पण फुटलेल्या नळांना खुट्या लावल्या नाहीत. त्यामुळे पाणीगळती सुरूच राहिली. यावरून मनपाचा बेजबाबदार कारभारही पुन्हा एकदा उघड झाला.
गेल्या दोन दिवसांपासून एन-२ परिसरातील कम्युनिटी सेंटरच्या बाजूला असलेल्या इंदूगंगा अपार्टमेंटसमोर रस्त्याचे काम सुरू असताना एका जेसीबीचालकाकडून १५० मिमी व्यासाच्या जलवाहिनीला जोडलेले दोन नळ कनेक्शन तोडले गेले. मनपाने त्यांची पुन्हा जोडणी केली. पण तोडलेल्या नळांना खुट्या ठोकण्याचा विसर पडल्याने शुक्रवार, डिसेंबर रोजी दुपारी जलवाहिनीत पाण्याचे प्रेशर वाढताच तोडलेले नळ निखळले आणि या जलवाहिनीमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचे लिकेज सुरू झाले. सलग दोन दिवस रस्त्यावर पाण्याचे पाट वाहत होते. असे असतानाही मनपाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. डीबी स्टारकडे तक्रार आल्यानंतर चमूने तपास सुरू केला. यानंतर मनपा पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कानावर ही बाब घातली. शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मनपाचे पथक आले आणि दुरुस्तीचे काम सुरू झाले. मात्र, पाण्याचे प्रेशर, त्यातच अंधार आणि अपुरी यंत्रणा यामुळे दुसऱ्या दिवशी दुरुस्ती करू, असे म्हणत पथक निघून गेले. या वेळी चमूने हे अर्धवट कापलेले नळ कनेक्शन कुणाचे, असा सवालही केला. पण पथकाने ते सांगण्यास टाळाटाळ केली.

डीबीस्टार तपास
या प्रकरणी डीबी स्टार चमूने माजी नगरसेवक दामोदर शिंदे यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा त्यांनी रस्त्याचे काम सुरू असताना जेसीबीमुळे हे दोन्ही कनेक्शन उघडे पडल्याचे सांगितले. त्यात हे कनेक्शन दीड इंचाचे असल्याचे दिसले. मनपा पाणीपुरवठा विभागाला हा प्रकार सांगितला. त्यांच्या स्थळ पंचनाम्यानुसार हे पाइप एडीसीएच्या हौदात सोडल्याचे लक्षात आले.
त्यांनतर हे अवैध नळकनेक्शन तोडले, पण तुटलेल्या नळांना लाकडी खुट्या लावून सील केल्याने पाणी सुरूच राहिले, तर दुसरीकडे दोन दिवसांपूर्वी येथे रस्त्याचे काम सुरू असताना जेसीबीने १५० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून दोन नळ कनेक्शन निखळले होते. ते एक इंचाचे असल्याचे आमच्या लक्षात आल्यावर आम्ही स्थळ पंचनामा करून आयुक्तांकडे अहवाल सादर केला आहे. आयुक्तांच्या आदेशाने पुढील कारवाई करणार असल्याचे महानगरपालिकेनेे स्पष्ट केले.

कारवाई सुरू आहे
तेनळकनेक्शन दीड इंचाचे की एक इंचाचे ही मी प्रत्यक्ष पाहिले नाही. ते दोन्ही अवैध नळ कनेक्शन तोडण्यात आले आहेत. त्याचा अहवाल अायुक्तांना पाठवणार आहोत. अद्याप अवैध नळ कनेक्शनधारक प्रशासनासमोर दाखल झालेला नाही. मात्र याप्रकरणी एडीसीएचा फोन आला होता. जे नळ कनेक्शन कापले ते वैध असल्याचा त्यांचा दावा आहे. पण घरगुती पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनी आणि तीही १५० व्यासाची असल्याने नियमानुसार तसे कनेक्शन देता येत नाही हे मात्र नक्की. आय.बी. ख्वाजा, उपअभियंता,पाणीपुरवठा विभाग, मनपा


एडीसीएने अवैध नळ कनेक्शन का घेतले?
आमचेनळ कनेक्शन अवैध नव्हते. २५ हजार रुपये आम्ही मनपाला भरल्याच्या रीतसर पावत्या आमच्याकडे आहेत.

पणमनपाने तर कारवाई केली आहे...
नाही.आम्हाला अद्याप याप्रकरणी मनपा प्रशासनाकडून विचारणा झालेली नाही.
तुम्हालातर राज्य शासनातर्फे अनुदान मिळत असेल ना?
शासनकुठलेही अनुदान देत नाही. दरवर्षी आम्हाला खिशातून दोन लाख रुपये खर्च करून मैदानाचा विकास करावा लागतो. आजपर्यंत २० ते २२ लाख रुपये खर्च केलेत.
लोकांकडूनफीच्या स्वरूपात पैसा मिळतो की नाही?
दीडहजार लोक मैदानाचा फायदा घेतात. त्याचा एक छदामही आम्ही घेत नाही. विभागीय क्रीडा संकुलात ३०० रुपये महिना आकारला जातो. उलट एडीसीएने जॉगिंग ट्रॅक केला. एक प्रकारे आम्ही ओसाड गावची पाटीलकी सांभाळतो.

‘ते’ कनेक्शन अवैधच
एडीसीएने१९८९मध्ये जलवाहिनीवर अवैध नळ जोडल्याचा आमच्याकडे पक्का पुरावा आहे. याबाबत परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या अनेक तक्रारीनंतर मी सातत्याने मनपाकडे पाठपुरावा केला होता. अखेर खोदकामात हे सत्य उघड झाले. संघटनेने पिण्यायोग्य पाण्याचा अपव्यय करून ते पाणी इतकी वर्षे मैदानावर वापरले. याप्रकरणी आम्ही खासगी तज्ज्ञांकडून हे कनेक्शन तपासले. ते दीड इंचाचे असल्याचे स्पष्ट झाले. मनपा मात्र हे कनेक्शन एक इंचाचे असल्याचे म्हणत कारवाई करण्यात चालढकल करत आहे. याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करा, अशी मागणी आम्ही आयुक्तांकडे केली आहे. -दामोदर शिंदे, माजीनगरसेवक
बातम्या आणखी आहेत...