आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uncertainty On 370 Buildings If Municipal Council Work Started

नगर परिषदेचा कारभार सुरू होताच ३८० इमारतींवर टांगती तलवार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सातारा-देवळाई परिसरातील अतिरिक्त बांधकाम करण्यात आलेल्या ३८० इमारतींवर कारवाईची टांगती तलवार कायम आहे. पाडापाडीनंतर पुन्हा बांधकाम झाले आहे काय तसेच त्या इमारतींचा पुन्हा वापर सुरू झाला का याची पाहणी प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. याबाबत प्रशासक तथा तहसीलदर रमेश मुंडलोड यांनी सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. नगरपालिकेच्या सुनावणी आक्षेपानंतर शासनाकडून निर्णय झाल्यानंतर या कारवाई होणार असल्याची माहिती मुंडलोड यांनी दिली.

१८ मे २०१५ रोजी सातारा-देवळाई नगर परिषदेचे महापालिकेत विलीनीकरण झाले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने पूर्ण दस्तऐवज मनपाकडे सुपूर्द केले. डिसेंबर २०१४ रोजी सातारा-देवळाई परिसरातील अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्यासाठी मोहीम राबवली. सिडको, जिल्हाधिकारी कार्यालयाची रेखांकन, आराखडा आणि अतिरिक्त बांधकामाबाबत परवानगी नसताना इमारती बांधल्या गेल्या. पार्किंग एक मजल्याऐवजी ते मजल्यांपर्यंत त्या इमारती उभ्या राहिल्या आहेत.

इमारतींचे सर्वेक्षण होणार : तत्कालीनजिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी ३८० इमारतींची यादी तयार करून नोटिसा बजावल्या. त्यानंतर पाडापाडी केली. पहिल्या टप्प्यात ५५ इमारती पाडण्यात आल्या होत्या. त्यानंतर काही इमारत विकासकांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने त्या इमारतधारकांना प्रत्येकी १० लाख रुपये अनामत रक्कम जमा करण्याचे आदेश दिले होते.

सुनावणीनंतर कारवाई
याबाबतमुंडलोड यांनी सांगितले, नगर परिषद हवी की मनपा याबाबत आक्षेपाच्या सुनावणी होणार आहे. त्यानंतर काय करायचे याचा निर्णय घेण्यात येईल. त्यानंतर इमारतींच्या सर्वेक्षणाबाबतची कारवाई सुरू करण्यात येणार आहे. सध्या प्रशासनाकडून केवळ टँकर पुरवण्याचे काम केले जात आहे. दररोज दहा टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा देखील केला जात आहे.