आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिगत गटार योजनेच्या वाटेत नाल्यांवरील २५० अतिक्रमणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- ३६५कोटी रुपयांच्या भूमिगत गटार योजनेच्या कामाला आलेला वेग आता नाल्यांवर झालेल्या अतिक्रमणांमुळे मंदावला आहे. शहरात ३५ ठिकाणी नाल्यांवर २५० अतिक्रमणे असून त्यातील काही पाडली तरच भूमिगतच्या पाइपलाइन टाकता येणार आहेत. या अतिक्रमणांवर अडथळ्यांवर तोडगा काढला नाही तर केंद्र पुरस्कृतही योजनाही अर्ध्यातच बंद करावी लागेल अथवा त्याला विलंब होण्याचा धोका आहे.

आज या योजनेचा आढावा घेण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात महापौर त्र्यंबक तुपे, आयुक्त प्रकाश महाजन, उपमहापौर प्रमोद राठोड, स्थायी समिती सभापती दिलीप थोरात, सभागृहनेते राजेंद्र जंजाळ, एमआयएमचे गटनेते नासीर सिद्दिकी, शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता अफसर सिद्दिकी, ठेकेदार कंपनीचे प्रकल्पप्रमुख समीर जोशी यांची उपस्थिती होती. या बैठकीत जोशी यांनी आतापर्यंत झालेल्या कामाचा तपशील देताना पुढील काम नाल्यांवरील अतिक्रमणे काढल्याने अडल्याचे सांगितले. कंपनीने शहराबाहेर कांचनवाडी, बनेवाडी, पडेगाव झाल्टा येथे उभारण्यात येत असलेल्या एसटीपी प्रकल्पापासून शहराच्या सीमेपर्यंत पाइपलाइन टाकल्या आहेत. शिवाय शहरातही मुख्य पाइपलाइनचे काम सुरू आहे. शहरातील नाल्यांवरील अतिक्रमणांमुळे या कामांना आता खीळ बसली आहे. कंपनीनेही ते बाेलून दाखवले. औषधी भवन, श्रीमान श्रीमती, बीएमसी बँक, भवानीनगर, सुराणानगर, कैलासनगर, शिवशंकर काॅलनी या भागांत प्रामुख्याने ही समस्या उभी राहिली आहे.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, किती आहेत नाल्‍यांवरील अतिक्रमणे..