आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भूमिगत गटार योजनेसाठी सात कोटी रुपये खर्चून तयार केलेल्या डीपीआरवर प्रश्नचिन्ह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महापालिकेनेसहा वर्षांपूर्वी डीपीआरनुसार (सविस्तर प्रकल्प अहवाल) निश्चित केलेले दोन ठिकाणचे एसटीपी (सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प) रद्द करून नव्या िठकाणी प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्तावच ३० नोव्हेंबरच्या सर्वसाधारण सभेपुढे येत आहे. यामुळे आधीच्या तीन प्रकल्पांसाठी बनवलेला डीपीआरचा लाखो रुपयांचा भुर्दंड मनपाला सोसावा लागणार आहे. शिवाय केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून होत असलेल्या भूमिगत गटार योजनेच्या नियोजनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे एकूणच योजनेचा ठेका ३० टक्के जादा दराने घेतलेल्या खिल्लारी कन्स्ट्रक्शनला नव्या कामांसाठी आणखी २९ कोटी २३ लाख रुपये देण्याचेही प्रस्तावात म्हटले आहे.

शासनाने शहरात भूमिगत गटार योजनेचे काम करण्यासाठी ४६४ कोटी रुपये दिले आहेत. यातून शहरातील आणि मुख्य जलनिस्सारण वाहिनी टाकण्यासह लोकसंख्या लक्षात घेऊन सिव्हेज ट्रिटमेंट प्लँट उभारण्यात येणार होते. मात्र प्रशासनाने तीन प्लँट कमी करून इतर कामे करण्यासाठी ठेकेदाराला २९ कोटी २६ लाख रुपये देण्यासाठी बुधवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेसमोर हा विषय ठेवला आहे. महानगरपालिकेने आधी सहा ट्रिटमेंट प्लँटचे नियोजन केले होते. आता चिकलठाणा विमानतळ आणि सिद्धार्थ उद्यानाच्या परिसरातील ट्रिटमेंट प्लँट रद्द करण्याचे ठरवले आहे. तसेच योजनेतील अनेक कामांना कात्री लावून अगोदरच ३० टक्के जास्तीच्या दराने काम घेणाऱ्या ठेकेदाराला अजून जास्तीचा निधी देण्याचा प्रस्तावही मनपा प्रशासनाने मांडला आहे.

महापौर त्र्यंबक तुपे यांच्या कारकीर्दीतील ३० नोव्हेंबरची शेवटची सभा असून याच सभेत ते राजीनामा देतील, असे संकेत आहेत. या बैठकीत २९ कोटी २६ लाख रुपये ठेकेदाराला देण्याचा प्रस्ताव असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ठेकेदाराला रेल्वे ट्रॅकखालून जलवाहिनी टाकण्यासाठी कोटी १४ लाख रुपये जास्तीचे द्यावेत. योजनेच्या पैशावर मिळालेल्या व्याजातून ही रक्कम द्यावी, अशी सूचना केली गेली आहे. योजनेत काही ठिकाणी जी.आर.पी. पाइप ऐवजी एम.एस. पाइप वापरण्याची मुभा मिळावी. ट्रिटमेंट प्लँट रद्द केल्याने कोटी १५ लाख रुपयांची बचत होणार आहे. पंपिंग स्टेशन उभारणीतही कोटी ६७ लाख रुपयांची बचत होणार आहे. या निधीतून भूमिगत गटार योजनेच्या ठेकेदाराने पडेगाव, गोलवाडी आणि वळदगाव शिवारात ट्रिटमेंट प्लँट, पंपिंग स्टेशनसाठी खासगी जागा विकत घेतली आहे. जागेचा मोबदला रेडीरेकनरनुसार त्वरित ठेकेदाराला पैसे देणे आवश्यक आहे. नसता मनपावरच त्याचा भार पडेल, अशी कारणे प्रस्तावात दिली आहेत.
काय दिली प्रकल्प रद्द करण्याची कारणे
१) सिद्धार्थ उद्यान - सेंट्रल झू अॅथॉरिटीचा आक्षेप २) चिकलठाणा विमानतळ - विमानतळ प्राधिकरणाने हरकत घेतल्याने
बातम्या आणखी आहेत...