आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिगत योजना कार्यान्वित झाल्यास शहर दुर्गंधीमुक्त!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अंतर्गत राजकारण, महापालिकेची कार्यपद्धती यामुळे चांगले प्रकल्प शहरात यशस्वी झाले नाहीत. परंतु सध्या भूमिगत गटार योजनेचे सुरू असलेले काम, त्याची गती लक्षात घेता जूनपासून हा प्रकल्प कार्यान्वित होईल. तसे झाल्यास शहरातील नाल्यांतून वाहताना दिसणारे सांडपाणी पाइपद्वारेच प्रक्रिया केंद्रावर जाईल. परिणामी शहर दुर्गंधीमुक्त होईल. दुसरीकडे उद्योगालाही पाणी मिळेल. केंद्र सरकाच्या निधीतून होणारा हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आहे. प्रकल्प पूर्णत्वाची मुदत अजून महिने असली तरी काही ठिकाणी ८० तर काही ठिकाणी ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे मान्सूनच्या आगमनापूर्वीच हा प्रकल्प सुरू होईल, असा प्राथमिक अंदाज आहे.
४० वर्षांपूर्वी शहरात ड्रेनेजलाइन टाकण्यात आल्या. अनेक ठिकाणी त्या बदलाव्या लागल्या. तरीही प्रक्रिया प्रकल्प हाती घेण्यात आले नाहीत. ड्रेनेजचे पाणी नाल्यात सोडले जाते. दुसरीकडे अनेक वाहिन्या फुटून ड्रेनेजचे पाणी रस्त्यांवर वाहते. त्यावर पर्याय म्हणून भूमिगत गटार योजना प्रकल्प राबवण्यात आला. त्याला केंद्राच्या योजनेत समाविष्ट करण्यासाठी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिल्ली दरबारी पाठपुरावा केला. त्याचे फलित येत्या काही दिवसांत औरंगाबादकरांना दिसेल.

२१६एमएलडी पाणी शुद्ध करण्याची क्षमता
शहरात आज घडीला दररोज ११० एमएलडी पाणी जायकवाडी प्रकल्पातून येते. काही भागांत नळ नाहीत. तेथे बोअर किंवा अन्य मार्गाने १० ते १५ एमएलडी पाण्याचा वापर होत असावा असा अंदाज आहे. थोडक्यात दीडशे सव्वाशे एमएलडी पाण्याचा शहरात वापर होतो. त्यातून ८० टक्के पाणी मलनिस्सारण वाहिन्यांतून जाते. भविष्यात शहराची गरज ३०० एमएलडीपर्यंत वाढू शकते. तेव्हा जास्तीत जास्त २४० एमएलडी पाणी वाहून जाईल. खासगी उद्योग आपल्याच जागेवर प्रक्रिया प्रकल्प घेणार असल्याने पालिकेच्या प्रकल्पात तेवढे पाणी शुद्धीकरणासाठी येणार नाही. त्यामुळे ३० वर्षांनंतरही हे प्रकल्प शहरातून वाहून जाणाऱ्या पाण्याचे शुद्धीकरण करू शकेल.

मध्ये केंद्राने यूआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत
~३६५.६९कोटीया प्रकल्पाला मान्यता
८०टक्केनिधी केंद्राचा, तर राज्य मनपाचा प्रत्येकी १० टक्के निधी लागणार होता.
प्रकल्पाचा खर्च निविदा प्रक्रिया काढल्यानंतर
~४६३कोटीगेला ३६ महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे बंधन.
शहराचा या योजनेत समावेश करण्यासाठी २००९ पासून प्रयत्न झाले होते.


^देशातील सर्वोत्कृष्ट प्रकल्प करण्याचा माझा प्रयत्न आहे. जूनला प्रकल्प कार्यान्वित करण्याची मुदत आहे. मनपाने सहकार्य केले तर वेळेआधीही ते पूर्ण होऊ शकते. कामाचा दर्जा तपासणीसाठी स्वतंत्र समिती आहेच. साहेबराव खिल्लारे, ठेकेदार, खिल्लारे कन्स्ट्रक्शन
नाल्यांत नाही दिसणार पाणी
सध्या भरउन्हाळ्यात शहरातील नाले भरून वाहताना दिसतात. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर पाणी थेट पाइपद्वारे प्रक्रिया केंद्रात जाईल अन् तेथे शुद्धीकरण झाल्यानंतर इतरांना वापरासाठी किंवा पुढे नाल्यात सोडले जाईल. त्यामुळे शहरातील नाल्यांत पाणीच जाणार नाही.
अशी आहे योजना
नाल्यांतून मोठ्या मलनिस्सारण वाहिन्या टाकून त्यांना प्रत्येक वसाहतीतील लहान वाहिन्या जोडणे. त्यावर एसटीपी उभारून तेथे निघणारे स्क्रॅप खत वेगळे करून पाणी शुद्ध करावे. हे पाणी खासगी उद्योग, बांधकाम तसेच शेतीच्या वापरासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.
प्रक्रिया केलेले पाणी काही देशांत पिण्यासाठी वापरले जाते. या प्रकल्पांतील पाणी ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्यापेक्षा शुद्ध असेल. परंतु येथील मानसिकता ते स्वीकारणार नाही. त्यामुळे हे कारखाने, बांधकाम उद्योजक शेतीसाठी दिले जाईल.
बातम्या आणखी आहेत...