आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Underworld Crime News In Marathi, Sequence On Crime, Divya Marathi

अंडरवर्ल्डचा बदलता चेहरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतामध्‍ये अंडरवर्ल्‍डचा चेहरा बदलत आहे. पुर्वी टोळी युध्‍दापासून सुरु झालेल्‍या या प्रकरणाचे आता सायबर क्राइमपर्यंत मजल गेली आहे.
1960-1970
सोन्याची बिस्किटे, चांदीच्या विटा, इलेक्ट्रॉनिक वस्तू, इर्म्पोटेड कपडे आणि विदेशी मद्य यांची तस्करी या काळात जोरात असायची.

1980-1990
तस्करीपेक्षा ड्रग्ज, खंडणी, बॉलीवूडकडून प्रोटेक्शन मनी यावर या टोळ्यांचा अधिक भर होता. टेलिफोनच्या तंत्राचा खुबीने वापर. बिल्डर, हॉटेल मालक आणि बॉलीवूडवर दहशत.

1990-2000
तस्करी, खंडणीच्या पुढचे पाऊल. अंडरवर्ल्डचा अक्राळविक्राळ चेहरा समोर आला. अंडरवर्ल्डची पाकिस्तानी आयएसआयसोबत दोस्ती. मुंबईत भयंकर बॉम्बस्फोट मालिका. टोळीयुद्धेही पेटली. पोलिसांची एनकाउंटर्सही वाढली.

2000-2014
टोळीयुद्धे थांबली. अंडरवर्ल्ड सोफिस्टिके टेड धंद्याकडे वळले. रिअल इस्टेटमध्ये प्रवेश. क्रिकेट मॅच फिक्सिंग,स्पॉट फिक्सिंगमध्ये सहभाग. हायटेक यंत्रणांमुळे अंडरवर्ल्डचा फायदाच झाला. सायबर क्राइमचा नवा प्रकार पोलिसांसाठी नवी डोकेदुखी घेऊन आला