आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचा 70वा स्वातंत्र्य दिन गणवेशाविनाच, पहिली ते आठवीच्‍या विद्यार्थ्‍यांचे स्‍वप्‍न अधुरेच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेंदुरवादा - स्वातंत्र्यदिनी गणवेश परिधान करून शाळेत जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे हे स्वप्न साकार होत नसल्याचे चित्र आहे. १५ ऑगस्टला शाळांच्या मैदानात शाळेच्याच गणवेशात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांच्या साक्षीने ध्वजारोहण होत असते, यंदा मात्र वेगळेच चित्र  दिसते.  

गणवेश पुरविण्याच्या धोरणात शासनाने केलेल्या बदलामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. गणवेश खरेदीसाठी पालकांना प्रत्येकी दोनशे रुपयेप्रमाणे चारशे रुपये अनुदान दिले जाणार आहे, पण व्यावहारिक अडचणींमुळे योजनेचा बोजवारा उडाल्याचे चित्र शेंदुरवादा परिसरातील परिषद शाळांमध्ये पाहावयास मिळत आहे. शाळा सुरू होऊन दोन महिने उलटूनही विद्यार्थी अद्यापही गणवेशाविनाच आहेत. त्यामुळे शासनाच्या या धोरणामुळे पालक, विद्यार्थ्यांमध्ये नाराजी असल्याचे दिसून येत आहे. पूर्वी गणवेशाची रक्कम संबंधित शाळांच्या मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापन समितीच्या खात्यात जमा केली जात होती. यामधून शाळा समितीच्या शिफारशीवरून गणवेशाची खरेदी करण्यात येऊन विद्यार्थ्यांना गणवेशाचे शाळा सुरू होताच तत्काळ वाटप करण्यात येत होते. मात्र यात भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी शासनाला मिळाल्याने या योजनेत यावर्षीपासून बदल करण्यात आला. आता पालकांनी गणवेश खरेदी करून खरेदी केलेल्या गणवेशाची बिले शाळेत मुख्याध्यापक यांच्याकडे सादर केल्यास विद्यार्थी पालकांच्या संयुक्त खात्यात चारशे रुपये जमा केले जातात. गणवेशासाठी विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या नावे संयुक्त खाते उघडावे लागते. त्यासाठी किमान पाचशे ते एक हजार रुपये खर्च येतो. गणवेशाच्या रकमेपेक्षा खाते उघडण्यासाठी जास्त रक्कम मोजावी लागत असल्याने पालक वर्ग चिंतेत आहे.
बातम्या आणखी आहेत...