आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाचोड येथे बेपत्ता युवकाचा मृतदेह शेततळ्यात आढळला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाचोड - चार ते पाच दिवसांपासून बेपत्ता झालेल्या युवकाचा मृतदेह आढळल्याची घटना शनिवार, ३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पैठण तालुक्यातील नानेगाव येथे उघडकीस आली .

पैठण तालुक्यातील पुसेगाव येथील रहिवासी धनंजय दामोदर वाहूळ (१९) हा युवक मंगळवार, २९ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास पुसेगाव येथून बेपत्ता झाल्याची तक्रार पाचोड पोलिस ठाण्यात वडील दामोदर वाहूळ यांनी ३० नोव्हेंबर रोजी येऊन केली होती व धनंजय वाहूळ हा मनोरुग्ण असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र शनिवार ३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास नानेगाव येथील शेतकरी लक्ष्मण बोधणे यांच्या शेतातील शेततळ्यात पाण्यावर तरंगणारा मृतदेह आढळला असता बोधणे यांनी तत्काळ पाचोड पोलिस स्टेशनला या घटनेची माहिती कळवली व मृतदेह पाण्यातून बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात आणला व बेपत्ता झालेल्या धनंजय वाहूळची मृतदेह असल्याचे पोलिसांना समजले. याची खात्री करण्यासाठी दामोदर वाहूळ यांना करण्यासाठी बोलावले असता ओळख पटल्याचे स्पष्ट झाले असून पाचोड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात
आली आहे.
बातम्या आणखी आहेत...