आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Union Bank ATM Robbery Issue At Cidco, Aurangabad

एटीएम फोडण्याचा हेतू पूर्वनियोजित; आणखी तिघांना अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- युनियन बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणार्‍या अक्षय चव्हाण या चोरट्यास पोलिसांनी जेरबंद केले होते. एटीएम फोडण्याआधी अक्षय आणि त्याच्या तीन मित्रांनी योजना आखली असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. दरम्यान, या प्रकरणातील इतर तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यातील एक जण अल्पवयीन आहे. दोघांना 4 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

सिडको एन-6 मध्ये एक लग्न होते. या लग्नात चौघेही हजर होते. त्यानंतर योगेश गुरधाळकर (19, रा. सिंहगड कॉलनी), सचिन पवार (21, एन-6), अक्षय आणि एक अल्पवयीन मुलाने अक्षयच्या घरात एटीएम फोडण्याचा प्लॅन आखला होता. अक्षयने लोखंडी सब्बल आणली. अल्पवयीन मुलाने चाकू घेतला. योगेश आणि सचिन एटीएमबाहेर थांबले होते. एटीएममध्ये अक्षय आणि अल्पवयीन मुलगा शिरला होता. पोलिसांनी एटीएमबाहेर थांबलेल्या दोघांना हटकले असता ते पळून गेले. अक्षय मात्र पोलिसांच्या हाती लागला. त्याच्या माहितीवरून तिघांनाही ताब्यात घेण्यात आले. अल्पवयीन मुलाला जामीन मिळाला असून दोन्ही आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एन. गोतसुर्वे यांनी पोलिस कोठडी सुनावली आहे. सहायक सरकारी वकील रूपाली मेतकेवार यांनी पोलिस कोठडीची मागणी केली. यापूर्वीच्या एटीएम फोडण्यातील घटनेत या टोळीचाच हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

योगेशचे आई- वडील पालिकेच्या शाळेत शिक्षक आहेत. तो पॉलिटेक्निकचे शिक्षण घेत असून पुण्याला नोकरी करतो. दोन महिन्यांपूर्वीच तो शहरात आला आहे. सचिन पवारने इंडो-र्जमन कंपनीत कोर्स केलेला आहे. त्याचे वडील खासगी कंपनीत काम करतात. एटीएम फोडून मौजमस्ती करण्याचा बेत या चौघांनी आखला होता. सर्वांना मद्यप्राशन करण्याची सवय आहे.