आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Union Minister Anant Geete Visit To Marathwada Auto Cluster Aurangabad

प्रत्यक्ष कृतीवर भर, 'मराठवाडा ऑटो क्लस्टर'ला केंद्रीय मंत्री अनंत गितेंची भेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- केवळ आश्वासने देऊन उद्योजकांच्या आशा पल्लवित करण्याऐवजी वाळूज औद्योगिक क्षेत्रात प्रत्यक्ष कृतीचा ठसा उमटवणार असल्याचे केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांनी सांगितले.
वाळूज येथील मराठवाडा ऑटो क्लस्टरमध्ये सुरू असलेल्या औद्योगिक प्रदर्शनाचा शनिवारी गिते यांच्या उपस्थितीत समारोप झाला. या वेळी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार प्रशांत बंब, महापौर त्र्यंबक तुपे, मराठवाडा ऑटो क्लस्टरचे चेअरमन राम भोगले, मासिआचे अध्यक्ष बालाजी शिंदे, मुनीश शर्मा आदींची उपस्थिती होती. प्रदर्शनाला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह कामगार, लघुउद्योजक, नागरिकांनी भेट दिली. प्रदर्शनाचे उद््घाटन केंद्रीय मंत्री मनोहर पर्रीकर, सुरेश प्रभू, राज्याचे िवत्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.
प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संपूर्ण मराठवाड्यातून आलेल्या तब्बल ८० उद्योजकांनी प्रदर्शनात सक्रिय सहभाग नोंदवत आपले स्टाॅल येथे उभारले होते. सध्या वाळूज येथील उद्योेजक तब्बल ८४ देशांमध्ये आपले उत्पादन पोहोचवत असल्याची माहिती शिंदे यांनी िदली. भविष्यात हा आकडा आणखी मोठा करण्यासाठी स्थानिक पुढाऱ्यांसह प्रशासनाच्या मदतीची त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. प्रदर्शनाचा समारोप झाला असला तरी रविवारी रात्रीपर्यंत प्रदर्शन सुरू राहणार असल्याची माहिती व्यवस्थापनाकडून देण्यात आली. दरम्यान, फायदा करून घेण्याच्या उद्देशाने आलेल्या अनेक जणांमुळे स्टॉलधारकांना त्रास झाल्याचे व्यवस्थापकांनी सांगितले. आपल्या कंपनीकडून एखाददुसरी ऑर्डर देता का? अशी विनवणी करत हातावर कार्ड थोपवणाऱ्यांमुळे मनस्ताप झाल्याचेही त्यांनी म्हटले.
८० उद्योजकांनी प्रदर्शनात आपले स्टॉल उभारले
८४ देशांमध्ये उद्योेजक आपले उत्पादन पाठवतात
प्रदर्शन महत्त्वपूर्ण
- स्टॉलला भेट देणाऱ्यांमध्ये सर्वाधिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांच्यातील उत्सुकता पाहून त्यांना संबंधित यंत्राबद्दल माहिती देताना आनंद होत आहे. भविष्यातही असे प्रदर्शने महत्त्वपूर्ण ठरतील.
संजय झनकर, बागलाग्रुप, मेकॅनिकल हेड
संधीचे सोने केले
- थेअरी नॉलेज आणि प्रॅक्टिकल यात तफावत असल्याचे आज प्रत्यक्षात अनुभवता आले. मी प्रथमच अशा प्रकारच्या प्रदर्शनाला भेट देत आहे. प्रदर्शनाला भेट देऊन संधीचे सोने केल्यासारखे वाटत आहे.
दीपाली निकम, विद्यार्थिनी,बीई इलेक्ट्रिकल
माहिती मिळाली
- चार भिंतीच्या आतमध्ये राहून खरे शिक्षण घेता येत नाही. त्याचा प्रत्यय मला येथे आल्यानंतर आला. खरोखर आपण आणखी खूप काही शिकणे बाकी असल्याची जाणीव या माहितीच्या भांडाररूपी प्रदर्शनामुळे झाली.
प्रथमेश भगत, विद्यार्थी, मेकॅनिकल इंजिनिअर