आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय मंत्री गिते, मुनगंटीवार यांचा दौरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते ३ जुलैला शहरात येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचा तपशील असा: दुपारी ४ वाजता विमानाने औरंगाबादेत आगमन होईल. ते हॉटेल रामा येथे मुक्काम करतील. ४ जुलैला सकाळी ११ वाजता वाळूज येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहतील. ५.३० वाजता मुंबईकडे प्रयाण करतील.

अर्थ, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार ३ जुलैला शहरात येत आहेत. सकाळी ९.३० वाजता विमानतळावर आगमन होईल. ते हॉटेल रामात थांबतील. ११ वाजता वाळूज येथील डेस्टिनेशन मराठवाडा मेक इन इंडिया प्रदर्शनाच्या उद््घाटन समारंभाला उपस्थित राहून ३ वाजता चंद्रपूरकडे प्रयाण करतील.