आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानसेवेची केंद्रीय मंत्री रुडी यांनी केली विचारपूस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - चिकलठाणा विमानतळावरून विविध कंपन्या विमानसेवा सुरू करण्यासाठी सरसावल्या आहेत. त्यासाठी विमानतळ प्राधिकरणही वेगाने प्रयत्न करत आहे. देश-विदेशातील कंपन्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुडी बुधवारी चिकलठाणा विमानतळावर अर्धा तास थांबले होते. या वेळेत त्यांनी निदेशक आलोक वार्ष्णेय यांच्याशी विमान सेवेविषयी चर्चा केली. इंडिगो एअरवेजची सेवा जानेवारीलाच सुरू होणार होती; पण काही अडचणींमुळे कंपनी उशीर करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले.

रुडी यांनी इंडिगो एअरवेजचे संचालक राहुल भाटिया यांच्याशी फोनवर संवाद साधला. औरंगाबादला तुम्ही विमान सेवा कधीपासून सुरू करत आहात, विलंब का होत आहे, असा प्रश्न रुडी यांनी विचारताच भाटिया यांनी एअरबस कंपनीकडून दोन विमान मिळण्यास उशीर झाल्याने औरंगाबादेतून विमानसेवा सुरू होऊ शकली नाही, पण मार्चमध्ये हे दोन्ही विमान इंडिगोला मिळणार आहेत. एप्रिलपासून विमानसेवा सुरू होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...