औरंगाबाद- आम्ही प्रादेशिक पक्षांच्या विरोधात असतो, तर शिवसेनेचे अनंत गिते मंत्रिमंडळात नसते. त्यामुळे भाजप प्रादेशिक पक्षांच्या विरोधात नसल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय जलसंसाधनमंत्री उमा भारती यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले. उद्धव ठाकरे माझ्या भावाप्रमाणे असून त्यांनी संयमाने बोलावे, असा सल्लाही त्यांनी दिला. राज्यात सर्वत्र भाजपची हवा असून आता केवळ एकाच पक्षाचे सरकार येण्याची प्रथा सुरू झाल्याचे भारती यांनी सांिगतले. जनता आता एकाच पक्षाला बहुमत देत आहे. उत्तर प्रदेशमधून त्याला सुरुवात झाली असून केंद्रातदेखील एकाच पक्षाचे सरकार आल्याचे सांगत राज्यातही भाजपचे सरकार येणार असल्याचा दावा त्यांनी केला.