आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Union State Minister Danve Agressive For Cabinet Ministry

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॅबिनेट मंत्रिपदासाठी दानवेंची मोर्चेबांधणी, पदाधिकार्‍यांचा गडकरींकडे आग्रह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर ग्रामविकास राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कॅबिनेट मंत्रिपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी त्यासाठी मोदींकडे शब्द टाकावा, असा आग्रह प्रदेश पदाधिकारी, नेत्यांकडून धरला जात आहे.

मराठवाड्यात मुंडे यांची जागा घेऊ शकणार्‍या नेत्याच्या नावाची चर्चा भाजपच्या वर्तुळात सुरू झाली तेव्हा तोच धागा पकडत दानवेंनी मोर्चेबांधणी सुरू केली. त्यांनी तालुका, जिल्हा पातळीवरून प्रदेश कार्यकारिणीकडे कार्यकर्त्यांमार्फत दबाव वाढवला आहे. एका वरिष्ठ भाजप पदाधिकार्‍यानुसार 26 जूनला विनोद तावडे, आशिष शेलार, गिरीश महाजन यांनी गडकरींची भेट घेतली. येत्या विधानसभेत भाजपला मराठवाड्यात मजबूत ठेवण्यासाठी दानवेंना कॅबिनेटपद द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले. पंकजा मुंडे या पोटनिवडणुकीत खासदार झाल्यावर त्यांना राज्यमंत्री आणि दानवेंकडे कॅबिनेट दिल्यास त्याचा पक्षाला फायदा होऊ शकतो, असेही म्हणणे मांडण्यात आले. त्यावर गडकरींनी ठोस आश्वासन दिले नसल्याचेही पदाधिकारी म्हणाला. दरम्यान, तावडेंनी दानवेंसाठी मोर्चेबांधणी करत असल्याचा इन्कार केला. हा अधिकार मोदींनाच असल्याचे तावडे म्हणाले.

मराठवाड्याला कॅबिनेट मंत्रिपद मिळायलाच हवे
मुंडेंच्या निधनानंतर मराठवाड्याला कॅबिनेटमंत्रीपद हवेच. ते मला मिळायला हवे, असा मुळीच आग्रह नाही. मात्र, जे मराठवाड्याच्या हक्काचे आहे ते मिळणे आवश्यकच आहे.
रावसाहेब दानवे, ग्रामविकास राज्यमंत्री