आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठरलेल्‍या नवरदेवाने दिला दगा, ऐनवेळी सहा विवाहेच्छूक झाले तयार, वधुसह बहिणीचेही उरकले लग्‍न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पत्रिकावाटून झाल्या... लग्नमंडप उभा राहिला.. पै-पाहुण्यांनी घर गजबजले... वऱ्हाड निघाले का, अशी विचारणा वधूपित्याने नवरदेवाकडे फोन करून केली. मात्र, उत्तराने वडिलांचे अवसान गळून गेले. हे लग्न आम्हाला मान्य नाही, वऱ्हाड येणार नाही हे वरमाईचे शब्द वधूपित्याच्या वर्मी लागले... प्रसंग बाका होता.. पण वधूपित्याच्या मित्रांनी जिल्हाभर फोन फिरवले. समाजात कोणी विवाहेच्छुक तरुण आहे काय, अशी विचारणा झाली. लगोलग सहा तरुण उभे ठाकले. अनोख्या स्वयंवरात मुलीने एकाची निवड केली आणि लग्न लागले. एवढेच नाही तर वधूच्या धाकट्या बहिणीचेही याच मांडवात दुसऱ्या तरुणाशी लग्न झाले.
नगरच्या कोळगाव येथील सागर पर्वतराव उबाळे याने औरंगाबादच्या भावसिंगपुऱ्यातील सविता अर्जुनराव घोरपडे हिला महिनाभरापूर्वी पसंती दिली. २६ जुलै लग्नाची तारीख ठरली. घोरपडेंच्या घरी लगीनघाई सुरू झाली. मिस्त्री काम करून घोरपडेंनी पैशांची जुळवाजुळव केली.
२५ जुलैच्या रात्री सागरच्या घरी वऱ्हाडी निघालेत का, अशी िवचारणा करण्यासाठी फोन केला. नकार मिळताच घरातील वातावरण बदलले. दोन्ही मुलींना रडू कोसळले. ख्रिस्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना हा प्रकार कळाला. समितीचे अध्यक्ष विजय ऊर्फ गुड्डू निकाळजे, नगरसेवक आशा निकाळजे आणि पदाधिकारी घोरपडेंच्या घरी पोहोचले. त्यांना धीर दिला. नगरला गाडी पाठवली, पण सागर त्याच्या घरचे मुंबईला गेल्याचे कळाले. या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्यात विनोद वैरागर, रतन पंडागळे, पास्टर प्रवीण बोरगे, नितीन पाटोळे, विल्सन गायकवाड, सुशील भालेराव, रवी साळवे, आर. बी गायकवाड यांनी परिश्रम घेतले.
सविताची लग्नगाठ अनिलशी
लग्न मोडण्याची चिन्हे दिसताच विजय निकाळजे आणि मित्र परिवाराने जिल्ह्यातील समाजाच्या लोकांना फोन केला. ज्यांच्या घरी लग्नासाठी मुले आहेत अशा सगळ्यांशी संपर्क साधला. रात्रभरातून सहा मुलांना घोरपडेंच्या घरी बोलावून घेतले. त्यातील एक नवरदेव सविताला निवडण्यास सांगितला. तिने अनिल श्रीसुंदर याची निवड केली. ठरलेल्या वेळेतच सविताचे लग्न झाले आणि आनंदाला पारावार उरला नाही.
सगळ्यांच्या मदतीने तारले
आमच्या कुटुंबावर असा प्रसंग येईल असे स्वप्नातही वाटले नाही. अशा वेळी सर्व मित्रमंडळी धावून आली. त्यामुळे स्वत: आणि कुटुंबाला सावरू शकलो. मित्रांनीच आम्हाला तारले. अर्जुनराव घोरपडे, वधूपिता
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, वधुच्‍या बहिणेनेही केली एकाची निवड..
बातम्या आणखी आहेत...