आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठ प्रशासनाने तोडगा देताच पडली आंदोलकांत फूट!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात फूट पाडण्यात प्रशासन यशस्वी झाले आहे. कुशल कर्मचाऱ्यांना दहा हजार, तर अकुशलला आठ हजारांच्या एकत्रित वेतनावर नियुक्ती देण्यास प्रशासन राजी झाल्याची माहिती आहे. त्यामुळे मंगळवारी दुपारी अर्ध्या आंदोलकांनी गाशा गुंडाळला.
अर्ध्यांनी मात्र संध्याकाळी सहापर्यंत आंदोलन केले. दोन दिवसांनी आंदोलनाचा इशारा देऊन त्यांनीही आंदोलन संपवले. मागील १० वर्षांपासून रोजंदारी पद्धतीने कार्यरत असलेल्या ४९४ कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून (११ जानेवारी) आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे विद्यापीठाचे कामकाज ठप्प पडले होते. प्रशासनाचा अर्ध्यापेक्षा अधिक ‘वर्कलोड’ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्याच खांद्यावर आहे. सायंकाळी वाजता कुलसचिव डॉ. महेंद्र शिरसाट यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन प्रतिनिधींशी चर्चा केली. अकुशलला आठ, तर कुशल कर्मचाऱ्यांना दहा हजारांचे वेतन देण्याचे मान्य केल्याचे त्यांनी सांगितले. त्याशिवाय अकरा महिन्यांऐवजी सहा महिन्यांच्या करारानुसारच एकत्रित वेतनावर घेण्याची अट त्यांनी ठेवली. डॉ. शिरसाट यांचा तोडगा राजर्षी शाहू महाराज रोजंदारी कर्मचारी संघटनेला मान्य झाल्यामुळे त्यांनी आंदोलनातून माघार घेतली.

..आणि उरलेल्यांचीही माघार
आंदोलनातबसलेल्या ३५० पैकी १८० जणांच्या माघारीमुळे उर्वरित १७० जणांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. त्यामुळे आता पुढे काय करावे, अशा द्विधा मन:स्थितीत उर्वरित आंदोलकांनी चारच्या पुढे म्हणजेच सायंकाळी सहापर्यंत आंदोलन केले. त्यानंतर मात्र त्यांनीही आंदोलन स्थगित केल्याचे सांगून पुन्हा १५ जानेवारीपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा दिला.
बातम्या आणखी आहेत...