आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, विद्यार्थी संसद सचिव निवड ऑक्टोबरला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष २०१५-१६ साठी विद्यार्थी संसद सचिव पदासाठीची निवडणूक ऑक्टोबर रोजी होणार आहे.
विद्यापीठात संसद सचिव पदासाठी अर्ज सादर करण्यासाठी १६ सप्टेंबर रोजी दुपारी वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे. हाच दिवस अर्ज सादर करण्यासाठी अखेरचा दिवस असेल. दुपारी वाजेनंतर आलेल्या अर्जांची छाननी करण्यात येईल. त्यातून सायंकाळी वाजेनंतर वैध उमेदवारांची सूची जाहीर करण्यात येणार आहे. २१ सप्टेंबर रोजी दुपारी वाजेपर्यंत सचिव पदाच्या उमेदवारीतून अर्ज मागे घेता येईल. दुपारी वाजेनंतर अंतिम यादी जाहीर करण्यात येईल. ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते दुपारी दरम्यान विद्यार्थी संसद सचिव पदासाठी मतदान होईल. दुपारी वाजता मतमोजणी करण्यात येईल. यानंतर विजयी उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात येईल. ही विद्यापीठ विद्यार्थी संसद निवडणूक प्रक्रिया कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या अध्यक्षतेखाली होईल.

४०० महाविद्यालये
विद्यापीठाअंतर्गतएकूण ४०० महाविद्यालये आहेत. सर्व महाविद्यालयांच्या संसद सचिव निवडणूक आणि सचिव निवड ही ऑक्टोबर रोजीच घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १८ सप्टेंबर रोजी दुपारी वाजेपर्यंत आहे. दुपारी चारनंतर अर्जांची छाननी करून सायंकाळी वाजता वैध उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल. २१ सप्टेंबर ही अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. सकाळी ११ ते या वेळेत मतदान होईल. दुपारी वाजेनंतर विजयी उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात येईल. महाविद्यालयांना संसद सचिव निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांची नावे ते ऑक्टोबरपर्यंत विद्यापीठात सादर करायची आहेत.

विभागप्रमुख आणि संचालकांना पत्र
सर्वविभागप्रमुखांनी ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी. यासाठी विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुहास मोराळे यांनी विभागप्रमुख तसेच उपकेंद्राचे संचालक यांना पत्र पाठवले आहे. मोराळे यांच्या कार्यकाळातील ही पहिलीच निवडणूक आहे.