आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठामध्ये आज राज्यघटनेवर परीक्षा, दोन सत्रांसाठी एकच पेपर सेट केल्याने तो फुटणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विद्यापीठात उद्या गुरुवारी प्रथमच भारतीय राज्यघनेवर परीक्षा होत आहे. तब्बल तीन हजार विद्यार्थी हा पेपर देणार आहेत. पण दोन सत्रांसाठी एकच पेपर सेट केल्याने तो सकाळच्या सत्रातच फुटणार आहे. हा पेपर एेच्छिक असला तरी तो फुटणार नाही, याची काळजी विद्यापीठाने घ्यायला हवी होती.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना सर्व विद्यार्थ्यांना माहीत व्हावी म्हणून कुलगुरू डॉ.बी.ए. चोपडे यांनी हा पेपर तेथे शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सक्तीचा केला आहे. उद्या गुरुवारी या विषयाची परीक्षा विद्यापीठात शिकणारे तब्बल तीन हजार विद्यार्थी देणार आहेत. विद्यापीठात चाळीस विभाग आहेत. ते सर्वच स्वायत्त असल्याने प्रत्येक विभागाने प्रथम सत्रात होणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक आपल्या सोयीनुसार तयार केले आहे. काही विभागांत सकाळी १० ते १.३०, तर काही विभागांत दुपारी ते ५.३० या वेळांत पेपर होणार आहेत. राज्यघटनेचा एकच पेपर सेट केल्याने तो सकाळी सायंकाळच्या सत्रांत द्यावा लागणार आहे. सकाळच्या सत्रातच तो फुटला तर दुपारच्या सत्रात देऊन काय उपयोग, असा सवाल काही प्राध्यापकांनी केला आहे.

नाट्यगृहाच्या सभागृहात झाले सामूहिक तास : राज्यघटनेचाविषय विधी विभागातील प्राध्यापकांनी शिकवला; पण तो प्रत्येक विभागात शिकवता नाट्य विभागाच्या सभागृहात सामूहिक तास झाले. ते तास किती, कसे झाले, याचा काही हिशेब नाही. हा पेपर तपासणाऱ्या प्राध्यापकांची यादीदेखील केली नसल्याचे प्राध्यापकांच्या निदर्शनास आले.

बुधवारी सायंकाळी निघाली नोटीस : विद्यापीठाच्या प्रथम सत्राची सुरुवात या पेपरने होत आहे, याची नोटीस बुधवारी सायंकाळी घाईने प्रशासनाने सर्व विभागप्रमुखांना दिली.

ही तर अवहेलना
-विद्यापीठाने हा पेपर सुरू करून चांगला आदर्श निर्माण केला, असे वाटले होते. पण सकाळ अन् दुपारच्या सत्रासाठी एकच पेपर सेट केला असेल तर राज्यघटनेची ती अवहेलनाच आहे. प्रशासनाने प्रत्येक विभागात वेगळे क्लास घेतले, तरच तो विषय कळेल. नाट्यगृहात क्लास घेऊन काय साधले? कुणाला तो विषय कळला असेल काय?
तुकारामसराफ, विद्यापीठ प्रमुख, भाविसे
बातम्या आणखी आहेत...