आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठही 'स्मार्ट सिटी' स्पर्धेत!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - स्मार्टसिटी स्पर्धेत आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठही उतरले आहे. हे विद्यापीठ स्मार्ट सिटीचे पहिले रोल मॉडेल ठरावे, अशी योजना विद्यापीठ प्रशासन आणि शहरातील उद्योजकांनी आखली आहे. त्या दृष्टीने अकरा कंपन्यांनी विद्यापीठाशी सामंजस्य करार केला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात शुद्ध हवा, भरपूर झाडे, पक्षी असे वातावरण असून मोठ्या प्रमाणात जैवविविधता असल्याने हे विद्यापीठ स्मार्ट सिटीचे उत्तम रोल मॉडेल तयार होऊ शकते, असा विश्वास व्यक्त करीत शहरातीलअकरा सॉफ्टवेअर कंपन्यांनी शुक्रवारी ३० ऑक्टोबर रोजी स्मार्ट सिटीच्या विकासात सहभागी होण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. यात औरंगाबाद शहरासह पुण्यातील उद्योगांचा समावेश आहे. बजाज कंपनीने गुरुवारी दीड कोटी रुपयांचा करार केला. त्यापाठोपाठ राज्यभरातून आलेल्या उद्योजकांनी विद्यापीठ स्मार्ट करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

सांडपाणी व्यवस्थापन करणार
स्मार्ट सिटीसाठी विद्यापीठाशी अकरा उद्योजकांनी करार केला. यात औरंगाबादच्या ग्लोबल एक्स्पर्ट, बॅन्कब्रीज सॉफ्टवेअर, कनेक्ट एंटरप्राइज, फाइंडॅबिलिटी सायन्सेस, व्हॅल्यू डी साॅफ्टवेअर, एक्सलाइज सॉफ्टवेअर, इन्फोग्रीड सॉफ्टवेअर आणि पुण्याच्या निओ इंजिनिअर्स कंपनीने करार केला आहे.

मोठे उद्योग कायपालट करू शकतात
बजाजने दीड कोटी रुपये दिले ही खूप सकारात्मक बाब आहे. त्यामुळे सर्व उद्योजकांनी ठरवले तर आपल्या विद्यापीठातच स्मार्ट सिटी होऊ शकते. कारण येथे उत्तम बायोडायव्हर्सिटी आहे. -आशिष गर्दे, अध्यक्ष,सीएमआयए
बातम्या आणखी आहेत...