औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ललित कला विभागाचा विद्यार्थी किरण विनायक गोरवाला याची अमेरिकेत होणाऱ्या चित्रप्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळच्या वतीने राज्यातून १० कलावंतांची निवड करण्यात आली आहे. एम. एफ. ए. पेंटिंग प्रथम सत्राचा विद्यार्थी किरण हा न्यूयॉर्क येथे होणाऱ्या महाराष्ट्र टुरिझम मंबई दिवाळी अट टाइम्स स्क्वेअर या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणार आहे. यात महाराष्ट्रातील लोकनृत्य, संगीत, गायन, चित्रकला आदी विविध कलांचे सादरीकरण होणार आहे. त्याला विभागप्रमुख प्रा. शिरीष यांचे मार्गदर्शन मिळाले. या निवडीबद्दल कुलगुरु डॉ. बी. ए. चोपडे, कुलसचिव डॉ. धनराज माने, प्रा. दिलीप बडे, प्रा. गजानन पेहेरकर, प्रा. रूपाली वाघ, प्रा. कुलदीप कारेगावकर, डॉ. राजेश करपे यांनी अभिनंदन केले आहे.