आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • University Received Foreign Funds Will Be Closed

विद्यापीठाला मिळणारा विदेशी निधी बंद होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने विदेशांकडून मिळणाऱ्या निधीचे विवरण गेल्या तीन वर्षांपासून सादर केले नाही. त्यामुळे विद्यापीठास मिळणारा विदेशी निधी बंद होण्याची चिन्हे असून ही नामुष्की आता सहन करावी लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठास केंद्रीय दर्जा प्राप्त व्हावा, देशातील नंबर वन विद्यापीठ बनावे, असे स्वप्न कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी रंगवले आहे; परंतु नेहमीच विदेश दौरे आणि संशोधन करारांमध्ये गुंतलेल्या विद्यापीठ प्रशासनाने मात्र आतापर्यंत मिळालेला निधी कुठे आणि कसा खर्च केला, याची माहिती केंद्राला दिलेली नाही. प्रत्येक विद्यापीठास मिळालेला निधी कुठे आणि कसा खर्च करण्यात आला, त्याचा किती उपयोग झाला याची माहिती राज्य सरकार आणि त्यानंतर केंद्र सरकारला पाठवणे बंधनकारक आहे. नव्या सरकारनेदेखील यासंबंधी कडक पवित्रा घेतला आहे. ही माहिती देणाऱ्या विद्यापीठांना मिळणारा विदेशी निधी बंद करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. विद्यापीठाने तर गेल्या तीन वर्षांत मिळालेल्या निधीची माहिती दिल्याने विद्यापीठावर हे संकट येऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
एवढेच नाही, तर विद्यापीठाचे नाव ब्लॅक लिस्टमध्येही टाकले जाण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. यासंबंधी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना विचारले असता, तीन वर्षांत काय झाले हे मला माहिती नाही; परंतु मिळणारा निधी हा चांगल्या कामासाठीच वापरला गेला पाहिजे. यापुढे अशी आर्थिक अनियमितता होणार नाही याची काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.