औरंगाबाद - गुलामगिरी अडकलेल्यांना माणूस म्हणून जगवण्याची शिकवण देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्याच्या घटनेस गुरुवारी २२ वर्षे पूर्ण झाली. नामविस्ताराचा जल्लोष करण्यासाठी गुरुवारी विद्यापीठ गेटसमोर लाखोंचा भीमसागर उसळला. विविध विचारमंचावर कलाकारांनी जल्लोषपूर्ण गीत सादर करून सर्वांची मने जिंकली. "माझ्या भीमाची पुण्याई आम्हा माणुसकी देई, त्यांनी दिधला मार्ग नवा....या विश्वाला बुद्ध हवा.....'असे शब्द उच्चारताच एकच जय भीमचा नारा गरजला. सकाळपासूनच गेटसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अनेकांनी बाबासाहेब आणि नामविस्तार लढ्यातील शहिदांच्या आठवणींनाही उजाळा दिला. रात्री भीमगीतांच्या कार्यक्रमानंतर मान्यवरांची भाषणेही झाली.
पुढे वाचा... विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे द्या; अन्यथा युतीतून बाहेर पडू : आठवले