आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • University Rename Program: Babasaheb Put World Restructure Theory

नामविस्तार सोहळा: बाबासाहेबांनी वैश्विक पुनर्रचनेचा सिद्धांत मांडला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या २२ व्या नामविस्तार सोहळ्यानिमित शहरातील सरस्वती भुवन आणि मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने खासदार डाॅ. भालचंद्र मुणगेकर यांना व्याख्यानासाठी निमंत्रित करण्यात आले हाेते.
प्रख्यात कवी, ज्येष्ठ विचारवंत डाॅ. यशवंत मनोहर यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात डाॅ. बाबासाहेबांनी मांडलेल्या वैश्विक पुनर्रचनेच्या सिद्धांतावर आपल्या विचारातून प्रकाश टाकला.
गरिबांनीच टिकवली लोकशाही : डाॅ. मुणगेकर
भारताचीलोकशाही आता परिपक्व झाली आहे. मात्र, ही लोकशाही टिकवण्यात सर्वात मोठी भूमिका गरिबांची आहे. झोपडपट्टीतल्या ७० टक्के लोकांनी सातत्याने मतदान करून सरकारे बदलली आहेत. त्यामुळे गरिबांमुळेच लोकशाही टिकून आहे, असे मत खासदार डाॅ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले. ते गुरुवारी सरस्वती भुवन आणि मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने आयाेजित ‘भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने’ या विषयावर बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या २२ व्या नामविस्तार दिनानिमित्त ललित कला अकादमीमध्ये चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार प्रकाश गजभिये, आमदार हेमंत टकले, आमदार सतीश चव्हाण, भाऊसाहेब चिकटगावकर, प्रा. जहीर अली, सरस्वती भुवनचे अध्यक्ष दिनकर बोरीकर, सचिन मुळे, दिनेश गंगापूरवाला यांची प्रमुख उपस्थिती होती.

देशाला आंबेडकर पुरेसे समजू शकले नाही : मुणगेकर म्हणाले, कोलंबिया विद्यापीठाच्या ३०० वर्षांच्या इतिहासात सर्वात हुशार विद्यार्थी म्हणून आंबेडकरांची नोंद आहे. मात्र, आपल्या देशातल्या मानसिकतेने आंबेडकर पुरेसे समजून घेतले नाहीत. प्रत्यक्षात त्यांचे विचार कृतीत उतरवले नाहीत. अनेकांना ते महागदेखील पडले असते. १९१८ मध्ये छोट्या शेतकऱ्यांचे प्रश्न आणि त्यावरील उपायावर त्यांनी लेखाच्या माध्यमातून चर्चा केली, पण अर्थतज्ज्ञांनीदेखील आंबेडकरांना समजून घेतले नाही.
राजकारणावर ३० टक्के उच्चभ्रूंचे वर्चस्व : भारताच्याराजकारणावर ३० टक्के सधन आणि उच्चभ्रूंचे वर्चस्व आहे. त्यामुळे हे लोक त्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे देशातील अनेक भागांत विकास पोहोचला नाही. मी आतापर्यंत २६ देशांचा प्रवास केला. मात्र, भारताइतकी विविधता, धर्म, भाषा, प्रांत, संस्कृती इतक्या मोठ्या प्रमाणात जगात कुठेच नाही. मात्र, या विविधतेवर हल्ला करण्याचे प्रयत्न सध्या सुरू असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

लोकशाही निवडणुकीपुरतीच : जहीरअली म्हणाले, भारतात धर्मनिरपेक्षतेबद्दल सध्या जे बोलले जात आहे तो सध्या मोठा जोक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. भारतात लोकशाही केवळ निवडणुकीपुरतीच पाहायला मिळते. इतर वेळी मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही ही लोकशाहीची मोठी कमतरता आहे. आपल्याकडे मुस्लिमांच्या बाबतीत केले जाणारे राजकारण हे इमोशनल आणि युजलेस असून केवळ मतपेटीसाठी केले जात असल्याची टीका त्यांनी केली. अलिगड विद्यापीठाच्या माध्यमातून उर्दू जतन केली पाहिजे असे सांगितले जाते. मात्र, अनेक राज्यांत मोठ्या प्रमाणात मुस्लिम आहेत मात्र त्या भागात मुस्लिमांची प्रमुख भाषा उर्दू नाही. त्यामुळे हा केवळ भावनेचा विषय असून त्यामधून रोजगारनिर्मिती होत नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रा.संजय मोहोड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यापीठ गीत सादर केेले.

चर्चेत अडकले जीएसटी
यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शरद पवारांच्या कारकीर्दीत काही महत्त्वाचे निर्णय निर्णायक वळण घेणारे ठरले. नामांतराचा निर्णय त्यापैकी एक असून त्याची राजकीय किंमतही त्यांना मोजावी लागली. संविधान दिनावर दोन दिवस चर्चा केल्यानंतर असहिष्णुतेवर चर्चा करावी लागते हे घातक असल्याचे त्यांनी सांगितले. जीएसटीच्या बाबतीत केवळ चर्चा सुरू आहे. काँग्रेसमुळे जीएसटी लागू होत नाही असा आरोप केला जातो. मात्र, पंतप्रधानांनी चर्चेसाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. दिनकर बोरीकर यांनी अध्यक्षीय समारोप केला.