आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्टॅनफोर्ड विद्यापीठासोबत पाच वर्षांसाठी सामंजस्य करार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अमेरिकेतील नामांकित विद्यापीठांपैकी एक असलेल्या स्टॅनफोर्ड विद्यापीठासोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मंगळवारी (५ जुलै) सामंजस्य करार केला. उभय विद्यापीठांमध्ये संशोधन कार्य, प्रकल्प, प्रशिक्षण आदींची पाच वर्षे देवाण-घेवाण होणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पॉल हर्बर सेंटर फॉर डीएनए बारकोडिंग अँड बायोडाव्हर्सिटी स्टडिज् आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठातील स्कूल ऑफ मेडिसीन यांच्यात विज्ञान-तंत्रज्ञानविषयक प्रकल्प, विद्यार्थी शिक्षकांच्या ज्ञान आणि वैचारिकतेची देवाण-घेवाण करण्यात येणार आहे. संयुक्त संशोधन प्रकल्प, शॉर्ट टर्म ट्रेनिंग आणि परस्परांमध्ये सांस्कृतिक देवाण-घेवाण करण्यात येणार आहे. पाच वर्षांपर्यंत हा करार राहणार आहे. येथील विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी स्वाक्षरी केली. स्टॅनफोर्ड विद्यापीठातील मेडिसीन विभागाचे संचालक प्रा. जयकुमार राजदास यांनी मेडिसीन सेंटरच्या वतीने सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या वेळी बीसीयूडी संचालक डॉ. के. व्ही. काळे, डीएनए बारकोडिंगचे संचालक डॉ. गुलाब खेडकर यांची उपस्थिती होती.
विद्यापीठ स्थापनेच्या १२५ व्या वर्षात झाला करार
दरम्यान,या प्रसंगी आयोजित केलेल्या चर्चासत्रात प्रा. जयकुमार राजदास यांचे भाषण झाले. ते म्हणाले, स्टॅनफाेर्ड विद्यापीठाचे १२५ वे स्थापना वर्ष सुरू आहे. या वर्षात हा करार होत असल्याचा आम्हाला आनंद आहे. नवोन्मेष दर्जेदार संशोधनाच्या माध्यमातून विद्यापीठाची प्रगती होण्यासाठी हा करार फायदेशीर ठरणार असल्याचेही त्यांनी म्हटले. कुलगुरू डॉ. चोपडे चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी होते.
बातम्या आणखी आहेत...