आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • University's Drama Of Question Paper : Old Syllabus Question In Question Papers

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्यापीठाचे प्रश्‍न पत्रिका पुराण : प्रश्‍न‍पत्रिकेत जुन्याचा अभ्‍यासक्रमाचे प्रश्‍न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - एमएस्सीच्या द्वितीय सत्रातील पेपरमध्ये जुन्या अभ्यासक्रमानुसार प्रश्न विचारण्यात आल्यामुळे गोंधळ उडाल्याने शुक्रवारी पेपर रद्द करण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर परीक्षांमध्ये शुक्रवारी आठ परीक्षा केंद्रांवर सकाळी 10 ते 1 या वेळेत एमएस्सी कॉम्प्युटर सायन्सचा ‘डाटा स्ट्रक्चर अँड अँनालिसिस ऑफ अ लॉगॅरिदम’ या विषयाचा पेपर होता. या पेपरसाठी पाचशे विद्यार्थी बसले होते, पण विवेकानंद महाविद्यालयात विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेत जुन्या अभ्यासक्रमानुसारच प्रश्न विचारले होते. विद्यार्थ्यांनी ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर पेपर थांबवण्यात आला. त्यानंतर दुपारी 12 ते 3 या वेळेत पेपर होणार, असे सांगण्यात आले. त्यानंतर विद्यापीठाकडूनच पेपर चुकीचा आल्याचे सांगण्यात आले.


विद्यापीठ प्रशासनाने पेपर रद्द करून 2 एप्रिलला होणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे सर्व परीक्षा केंद्रांवरील पेपर रद्द करून विद्यार्थ्यांकडून प्रश्नपत्रिका परत घेण्यात आल्या.