आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाळी पावसाचा फटका, मराठवाड्यात १ हजार २५५ हेक्टर पिकांची नासाडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मार्च महिन्यात पहिल्या १० दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाचा फटका मराठवाड्यातील नांदेड,हिंगोली, बीड,उस्मानाबाद या चार जिल्ह्यांना बसला असून १२५५ हेक्टरवर ५० टक्क्यांहून जास्त नुकसान झाल्याची माहिती विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी दिली.

मार्च महिन्यातील पहिल्या दहा दिवसातील अवकाळी पावसाने हाताशी आलेले रब्बीचे पीकही गमावण्याची वेळ आली आहे. त्यापैकी तीन जिल्ह्यांचा पंचनाम्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
सर्वाधिक फटका उस्मानाबाद जिल्ह्याला बसला आहे. या जिल्ह्यातील ७३८ शेतक-यांच्या ६११ हेक्टरवरील पिकांचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले. गहू, ज्वारी, हरभरा या पिकांना मोठा फटका बसला आहे. आंबा तसेच फळबागांचेही नुकसान झाले . नांदेड जिल्ह्यातील १३२ शेतक-यांचे ७९ हेक्टरचे, तर बीड जिल्ह्यातील ८८३ शेतक-यांचे ५६५ हेक्टरवरील पिकांचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. हिंगोली जिल्ह्याचा अहवाल अजून प्राप्त झालेला नाही.