आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Unseasonal Rain Lashes Cash Crops In Maharashtra

अवकाळी नववर्षाव! बेमोसमी पाऊस, पिकांना तडाखा, मराठवाड्यात जोर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे/औरंगाबाद - नव्या वर्षाचा पहिलाच दिवस राज्यात अवकाळी पाऊस घेऊन आला. गुरुवारचे ढगाळ हवामान आणि पावसामुळे शेतीपुढील संकट वाढले आहे. द्राक्ष, डाळिंब, आंबा या फळपिकांना या वातावरणाचा फटका बसणार आहे. हुरड्यात आलेल्या जिरायती ज्वारीचाही रंग पालटण्याची भीती आहे. हा पाऊस असाच पडत राहिला तर करडई, हरभर्‍याला बाधा पाहोचेल. तथापि, पाऊस अनुकूल असला तरी थंडी गायब झाल्याने गहू उत्पादनालाही फटका बसू शकतो.

गेल्या २४ तासांत मराठवाड्यातील लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड जिल्ह्यांत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण व हलका ते मध्यम पाऊस आहे. विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. कोकण, मध्य महाराष्ट्रातही काही जागी जोरदार सरी पडल्या. ढगाळ हवामानामुळे तापमानात सरासरीपेक्षा वाढ झाली असली तरी बोचरे वारेही वाहत होते. दोनच दिवसांपर्वी पारा सहा-सात अंशांपर्यंत घसरला होता. गुरुवारी नीचांकी तापमान चंद्रपूर येथे १० अंश सेल्सिअस नोंदले गेले. उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणचे किमान तापमान सरासरी १५ अंशांच्या पुढे होते.

वाशी तालुक्यात गारपीट : उस्मानाबादच्या वाशी तालुक्यातील पारा, लाखनगावात बुधवारी पाऊस व गारपीट झाली. फुलोर्‍यातील ज्वारी पडली. रब्बी पिकांना तडाखा बसला. वादळाने झाडांच्या फांद्या तुटल्या. गुरुवारीही येथे अर्धा तास पाऊस झाला.
प्रभाव राहणार, गारपीटही शक्य
या हवामानाचा प्रभाव ४८ ते ७२ तास राहणार आहे. दरम्यान, पश्चिमी िवक्षेपाचे वारे तीव्र झाल्यास येणार्‍या काळात पावसासह गारपिट होण्याची शक्यताही आहे. - श्रीनिवास औंधकर, हवामान तज्ज्ञ, नांदेड.

पुढे वाचा, थंडी गायब; पावसाची भीती २४ तास कायम....