आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन दिवस अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पूर्व आणि पश्चिमेकडील वारे तसेच वातावरणातील बाष्पाचे मिलन झाल्याने वातावरणात द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, शुक्रवार ते रविवार तीन
दिवस राज्यात बहुतांश ठिकाणी बेमोसमी पावसाची शक्यता आहे. मराठवाडा, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जास्त जोर राहील. काही ठिकाणी गारपीट
होण्याचा अंदाजही हवामानतज्ज्ञांनी वर्तवला आहे.
हिवाळ्यात साधारणत: उत्तरेकडून वारे वाहते, पण सध्या अफगाणिस्तान, पाकिस्तानकडून जम्मू काश्मीरकडे वारे वाहत आहे. याला पश्चिमी विक्षोप असे म्हणतात. या
वाऱ्यामुळे हवामानात प्रचंड बदल झाला असून ढगाळ वातावरणामुळे थंडीचा जोर ओसरला आहे. डिसेंबर रोजी किमान तापमान ११.८ अंश सेल्सियसच्या खाली घसरले
होते, पण पश्चिमी विक्षोप आणि आग्नेय वाऱ्यांमुळे वातावरणात बदल होऊन आकाशात ढगांची गर्दी होत आहे. परिणामी, ११ डिसेंबर रोजी किमान तापमानात सहा अंश
सेल्सियसने वाढ होऊन ते १७.८ अंश सेल्सियसवर पोहोचल्याने थंडीला पुन्हा ब्रेक लागला आहे. सोलापूर, कोल्हापूर, मराठवाड्यासह मध्य प्रदेश, कर्नाटक, पंजाब,
हरियाणामध्ये अवकाळी पावसाची शक्यता चिकलठाणा वेधशाळेचे सहायक हवामान शास्त्रज्ञ पंढरीनाथ साळवे हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी वर्तवली आहे.