आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढील चार दिवस अवकाळी पाऊस, गारपिटीची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद/लातूर - मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत येत्या ४८ तासांत तुरळक ठिकाणी वादळी वार्‍यासह गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पूर्व व मध्य भारतात कमी हवेच्या दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. समुद्रावरही दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मराठवाड्यात १४ एप्रिल आणि विदर्भ व उर्वरित महाराष्ट्रात १५ एप्रिलपर्यंत मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस व गारपीट होण्याची शक्यता आहे. १२ एप्रिल रोजी मराठवाड्यात सर्वत्र वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस व दुपारनंतर गारपीट होण्याची शक्यता आहे.

लातूर, हिंगोली, नांदेडला जास्त फटका : पुढील चार दिवस विशेषत: लातूर, नांदेड, हिंगोली परिसरात मध्यम स्वरूपाची गारपीट होण्याची शक्यता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे ग्रामीण कृषी हवामान विभागाचे मुख्य समन्वयक प्रा. प्रल्हाद जायभाये यांनी वर्तवली.

मराठवाड्याला दणका, दोन ठार
लातूर, हिंगोली, बीड, जालना, उस्मानाबाद, परभणी जिल्ह्यात शनिवारी वादळी वार्‍यासह पाऊस झाला. वीज काेसळून वाळूज परिसरातील साजापूर गावात शेख शमशाद बेगम तय्यब ही महिला, तर तर वडवणी (जि. बीड) तालुक्यात चिंचोटी येथे श्रीराम पाचणकर (४०) ठार झाले. भोकरदन तालुक्यात तासभर पाऊस झाला. बीड जिल्ह्यात आष्टी, गेवराई, वडवणी, माजलगाव तालुक्याला पावसाने झोडपले.

कमी दाबाचा पट्टा
हवेचा दाब १०१० वरून १००८ हेप्टा पास्कलवर आल्याने मराठवाड्यात १४ एप्रिलपर्यंत अवकाळी पाऊस, गारपीटही हाेऊ शकते. डॉ. रामचंद्र साबळे, हवामानतज्ज्ञ (राज्य हवामान सल्लागार.)