आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्‍ट्रात आज वादळी पाऊस, गारपिटीची शक्यता, सतर्कतेचा इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागरावर हवेचे कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले आहेत. आंध्र प्रदेश, तामिळनाडूत ईशान्य मान्सूनचा पाऊस होत असून मराठवाड्यात तापमान जास्त असल्याने तिकडून वाहणारे थंड वारे आणि उष्ण बाष्प घेऊन येणाऱ्या वाऱ्याचा संगम होऊन दक्षिण भारतावर चक्रवात निर्माण झाला आहे. त्यामुळे शनिवारी मुंबई, रत्नागिरी, नाशिक, त्र्यंबकेश्वर, पाटोदा आणि बीड जिल्ह्यात पाऊस पडला. औरंगाबादसह राज्यात ढग दाटून आले होते. जोरदार पाऊस पडण्याचे संकेत असतानाच पावसाने हुलकावणी दिली. मात्र, रविवारी आणि सोमवारी मराठवाड्यात अनेक भागात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, का पडतोय अवेळी पाऊस ?