आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारे मनपा निवडणुकीचे : वॉर्डार्ड पद्धतीनेच होणार मनपा निवडणूक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आगामीमहानगरपालिकेची निवडणूक प्रभागानुसार होणार असे जाहीर झाल्याने अनेकांनी चिंता व्यक्त केली होती; परंतु राज्यात सत्तांतर झाल्यानंतरही निवडणूक वॉर्डार्ड पद्धतीने होणार, असे वृत्त ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केले होते. त्यानुसारच सध्या प्रक्रिया सुरू असून यास विलंब होत असल्यामुळेच डिसेंबरच्या मध्यापर्यंत जाहीर होणारी वॉर्डार्ड किंवा प्रभाग आरक्षण प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. आयोगाने भूमिका घेतली असली, तरी ही निवडणूक वॉर्डार्ड पद्धतीनेच घेण्याबाबतची संचिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मेजावर असल्याचे समजते.

सध्या पालिकेत ९९ नगरसेवक आहेत. वाढती लोकसंख्येमुळे ही संख्या १२० होईल. परंतु यासाठी जेवढे नगरसेवक तेवढे वॉर्डार्ड ही जुनी पद्धत रद्द करून प्रभाग निर्माण करून एका प्रभागात दोन नगरसेवक अशी पद्धत अमलात येईल, असे जाहीर झाले होते. याचा काँग्रेस आघाडीला फायदा, तर युतीला तोटा होईल, असे युतीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना वाटत होते. त्यामुळे ही पद्धत रद्द करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली होती.
सेनेच्या भूमिकेत बदल?
सत्तेवरआल्यास औरंगाबाद मनपात वॉर्डार्ड पद्धतीनेच निवडणूक होईल, असे छातीठोकपणे सांगणाऱ्या एका सेना नेत्याने मंत्रिपद मिळताच कोणती पद्धत चांगली हे मला समजून सांगा, असे शहरातील सेना नेत्याला विचारले. हे नेतेही काही क्षण चक्रावले, तरीही त्यांनी समजावून सांगितले. मात्र, अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेणार आहेत.
काय असतील फायदे-तोटे? : प्रभागझाल्यास सध्याचे दोन वॉर्डार्ड एकत्र येतील. काही भागांत याचा फटका युतीला बसून सध्याची सदस्य संख्या कमी होईल, अशी भीती युतीच्या नेत्यांना आहेत. त्यातच एमआयएम येथे दाखल झाल्याने त्यांचाही फटका बसेल.

प्रभाग निवडणूक लढवण्यापेक्षा विधानसभा लढवलेली बरी, अशी अनेकांची प्रतिक्रिया होती. कारण एक प्रभाग म्हणजे किमान लाख लोकांसमोर जाणे आवश्यक आहे. यासाठी येणारा खर्च त्यानंतर मिळणारे फायदे लक्षात घेता या वादात पडलेले बरे, असे अनेकांचे म्हणणे आहे. शिवाय प्रत्येक प्रभागात एक महिला उमेदवार असणार हे ५० टक्के आरक्षणानुसार अनिवार्य असल्यामुळे पक्षाच्या एका उमेदवाराला त्या महिला उमेदवाराचा प्रचार स्वखर्चानेच करावा लागणार आहे.