आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२६.३२ कोटींत करोडीत उभे राहणार अद्ययावत आरटीओ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - करोडी येथे अद्ययावत प्रादेशिक परिवहन कार्यालय उभारण्यासाठी शासनाने २६.३२ कोटींचा निधी मंजूर केला आहे. निधी उपलब्ध होताच टेंडरिंगद्वारे सर्वप्रथम वाहन चाचणी ट्रॅक लगेच इमारतीचे बांधकाम सुरू होणार आहे.
रेल्वे स्टेशन परिसरातील प्रादेशिक परिवहन विभागाची इमारत जुनी झाली आहे. वाहनांची संख्याही प्रचंढ वाढली आहे. यामुळे वाहन चाचणीसाठी जागा अपुरी पडत असल्याने शेंद्रा एमआयडीसीत पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. सध्याच्या कार्यालयात पार्किंगची व्यवस्था नाही. या सर्व समस्यांवर मात करणे एकाच छताखाली नागरिकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गत दोन वर्षांपासून जागेचा शोध सुरू होता. अखेर जानेवारी २०१६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी करोडी येथील ११ एकर जागा नवीन मॉडेल आरटीओ कार्यालय उभारण्यासाठी दिली. त्यानंतर ट्रॅक इमारत उभारणीसाठी पीडब्ल्यूडी आरटीओ प्रशासनाने सर्वेक्षण करून प्रथम २३ कोटी नंतर ३.३२ कोटी असे एकूण २६.३२ कोटींचा प्रस्ताव राज्य परिवहन आयुक्त शासनाच्या मान्यतेसाठी मार्चमध्ये पाठवला होता. त्यास सहा महिने होऊनही मान्यता मिळत नसल्याने काम रखडले होते.

या संदर्भात “दिव्य मराठी’ने वृत्त प्रसिद्ध करून प्रकाश टाकला होता. तसेच २५ ऑगस्ट रोजी परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी स्वत: आरटीओ कार्यालयास भेट देऊन पाहणी केली. त्यांना करोडी येथे नवीन मॉडेल आरटीओ कार्यालय उभारण्याचा प्रस्ताव पडून असल्याचे लक्षात आणून दिले असता तातडीने मंजुरी देण्यात येईल, अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार शासनाने २६.३२ कोटी रुपये खर्चास मान्यता दिली आहे.

आता त्वरित निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. निधी प्राप्त होताच टेंडरिंग काढून ट्रॅक इमारत बांधकामास सुरुवात केली जाणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांनी सांगितले.

हा होईल फायदा
नवीन कार्यालयातील सर्व विभाग संगणकाने जोडली जातील. वाहन चाचणीपासून पुढील सर्व कामे एकाच छताखाली होतील. दलालांना आत प्रवेश मिळणार नाही. यामुळे नागरिकांची आर्थिक लूट थांबण्यास मदत होईल. लिफ्टची व्यवस्था असेल. ११ एकर क्षेत्रावर सीसीटीव्ही व्हाइस रेकॉर्ड कॅमेरे लावण्यात येतील. त्यामुळे सूक्ष्म हालचाली आवाज रेकॉर्ड होणार असल्याने कामकाजात पारदर्शकता येऊन प्रलंबित प्रकरणांचा लवकर निपटारा होईल. दुचाकी, तीन चार, आठ, बारा, अठरा चाकी वाहन चालवण्याच्या चाचणीसाठी अद्ययावत ट्रॅक तयार केला जाणार आहे. यामुळे शेंद्रा येथे ये-जा करण्याची आवश्यकता राहणार नाही.

सौर संच बसवणार
इमारतीवर सौर ऊर्जा संच बसविण्यात येणार आहे. स्वत: वीजनिर्मिती करणे त्याचा वापर करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. रेनवॉटर हार्वेस्टिंगद्वारे जलपुनर्भरण पाण्याचा वापर केला जाणार आहे, अशी माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे कार्यालयीन अधीक्षक व्ही. बी. गांगुर्डे यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...