आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत झालेल्या UPSC पूर्वपरीक्षेला 50 टक्के उमेदवार गैरहजर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल) - Divya Marathi
(फाईल)
औरंगाबाद - संघ लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या सिव्हिल सर्व्हिस परीक्षेस दोन्ही सत्रांमध्ये जवळपास पन्नास टक्के विद्यार्थी गैरहजर होते. ही परीक्षा रविवारी शहरातील ३० उपकेंद्रावर घेण्यात आली. या परीक्षेसाठी ९ हजार ६३५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यात सकाळच्या सत्रात ४ हजार ७३६ विद्यार्थी उपस्थित होते तर ४८९९ विद्यार्थी गैरहजर होते. दुपारच्या सत्रात ४६८२ विद्यार्थी उपस्थित होते. तर ४ हजार ९५३ विद्यार्थी गैरहजर होते. परीक्षेसाठी १२०० कर्मचारी कार्यरत होते. ही परीक्षा जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...