आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिका-भारतातील व्यापार पाचपटीने वाढला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मोदींचे सरकार सत्तेवर आल्यापासून देशात तणाव वाढल्याचे आणि त्यामुळे परदेशी विशेषत: अमेरिकेची गुंतवणूक कमी झाल्याचे म्हटले जात होते. पाकवरील सर्जिकल स्ट्राइकनंतर गुंतवणुकीवर परिणाम होणार असा प्रचार काही मंडळी करत आहेत. मात्र, या प्रचारात काहीच अर्थ नाही. अमेरिकेच्या भारतातील गुंतवणुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. दोन्ही देशातील व्यापार पाचपटीने वाढल्याचे मंुंबईतील अमेरिकी वकिलातीचे (कॉन्स्युलेट जनरल) टॉम वायडा यांनी सांगितले. मोदींनी दोन वर्षात अमेरिकेला आठ वेळा दिलेल्या भेटीमुळे दोन्ही देशातील संबंध अधिक बळकट झाले आहेत. आता व्हाइट हाऊसमध्ये कोणीही राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले तरी हे संबंध कायम राहतील, असेही ते म्हणाले.
अमेरिकेत शिक्षण, पर्यटन, उद्योग, व्यापार क्षेत्रात गुंतवणुकीसाठी भारतीयांना निमंत्रित करण्याकरिता अमेरिकने सरकारतर्फे ‘यूएस टू गो’ कार्यक्रम राबवला जात आहे. त्याची माहिती देण्यासाठी वायडा गुरुवारी औरंगाबादेत आले होते. तेव्हा त्यांनी हॉटेल विव्हांटा बाय ताजमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, दोन्ही देशांमध्ये २००० साली १९ बिलियन डॉलर्सचा व्यापार होता. २०१६ पर्यंत तो पाच पटीने वाढून १०० बिलीयन्सवर पोहोचला आहे. येणाऱ्या काळात तो ५०० बिलियन्सवर पोहोचेल. २०१४ मध्ये अमेरिकेत १३ टक्के भारतीय विद्यार्थी होते. २०१५ मध्ये ही संख्या २९ टक्के झाली आहे. अमेरिकेत नोकरी करणाऱ्यांसाठी आवश्यक एच-वन बी व्हिसाधारकांपैकी ७० टक्के भारतीय आहेत. ही संख्या आणखी वाढावी यासाठी महाराष्ट्रासह पाच राज्यात यूएसटू गो हा कार्यक्रम राबवला जात आहे. औरंगाबादेतील विद्यार्थी त्याचा लाभ घेऊ शकतात, असे लक्षात आल्यामुळे येथे या उपक्रमाची माहिती देण्यासाठी आलो असल्याचे ते म्हणाले.

तत्पूर्वी सीआयआयतर्फे आयोजित कार्यक्रमात ऋषिकुमार बागला यांनी प्रास्ताविक केले. संदीप नागोरी यांनी आभार मानले. सकाळी वायडा यांनी वाळूज एमआयडीसीतील जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला भेट दिली. महिकोचे प्रतिनिधी आणि विद्यापीठात पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांच्यासोबत महिला सबलीकरण, स्त्री-पुरुष समानतेवर चर्चा केली.

व्हीसाधारकांपैकी ७० टक्के भारतीय आहेत. ही संख्या आणखी वाढावी यासाठी महाराष्ट्रासह पाच राज्यात युएसटू गो हा कार्यक्रम राबवला जात आहे. औरंगाबादेतील विद्यार्थी त्याचा लाभ घेऊ शकतात, असे लक्षात आल्यामुळे येथे या उपक्रमाची माहिती देण्यासाठी आलो असल्याचे ते म्हणाले.

तत्पूर्वी सीआयआयतर्फे आयोजित कार्यक्रमात ऋषीकुमार बागला यांनी प्रास्ताविक केले. संदीप नागोरी यांनी आभार मानले. सकाळी वायडा यांनी वाळूज एमआयडीसीतील जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीला भेट दिली. महिकोचे प्रतिनिधी आणि विद्यापीठात पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांच्यासोबत महिला सबलीकरण, स्त्री पुरूष समानतेवर चर्चा केली.

ते सरकारचे धोरण नाही
२००५ते २००८ दरम्यान अमेरिकेत बीपीओ, आयटी कंपन्यात मोठ्या संख्येने भारतीय होते. आता घट झाली. त्यामागे सरकारी धोरण नाही. कंपन्यांनी नफा-तोट्याची गणिते पाहून कपातीचा निर्णय घेतला असावा, असे ते म्हणाले.

ओबामा भारावले
वायडा म्हणाले, भारताच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी निमंत्रित केल्यामुळे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारावून गेले. दोन्ही नेते वेगवेगळ्या विषयांवर हॉटलाइनवर चर्चा करतात. पर्यावरण, व्यापार, उद्योग, वाणिज्य, क्लीन एनर्जी, पायाभूत सुविधा, शिक्षण, स्मार्ट सिटीत संबंध वाढीस मोठी संधी अाहे.
बातम्या आणखी आहेत...