आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादचे कॅडेट्सही देणार ओबामांना सलामी, मान्यवरांसोबत संवाद साधण्याची संधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे आयोजित मुख्य सोहळ्याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांना या वेळी भारतीय सैन्यदलासह विविध दले आणि एनसीसी तर्फे मानवंदना दिली जाणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यातील ३५ एनसीसी कॅडेट्सची निवड झाली असून यात औरंगाबाद शहरातील १५ कॅडेट्सचा समावेश आहे.
मान्यवरांसोबत सहभोजन : आरडीसी कॅम्पमध्ये सहभागी होणाऱ्या एनसीसी कॅडेट्स आणि एनएसएसशीसंबंधित विद्यार्थी परेडनंतर प्रमुख पाहुण्यांबरोबरच राष्ट्रपती, राज्यपाल, प्रधानमंत्री, उपराष्ट्रपती, संरक्षणमंत्री यांच्याबरोबर सहभोजनाची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या विद्यार्थ्यांत अमोल शिंदे, मयूर कोल्हे, शिवाजी वाबळे, रूपेश कोकाटे, राहुल टाक,
प्रियंका नितनवरे, कल्पना शिंदे, अश्विनी इंगळे, राम म्हस्के, कुंदन तेलगोटे, िसमरन सरहद्दी यांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांची मेहनत
राजपथवर होणाऱ्या परेडमध्ये संधी मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना खूप मेहनत करावी लागते. वेगवेगळ्या स्तरांवर स्वत:ला सिद्ध करावे लागते, असे एनसीसीच्या एका प्रशिक्षकाने सांगितले.